जिजाऊ ज्ञान मंदिरात महात्मा फुले स्मृतिदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून उत्साहात साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 29, 2025

जिजाऊ ज्ञान मंदिरात महात्मा फुले स्मृतिदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून उत्साहात साजरा

 जिजाऊ ज्ञान मंदिरात महात्मा फुले स्मृतिदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून उत्साहात साजरा





कोंडी (कटूसत्य वृत्त):- जिजाऊ ज्ञान मंदिर येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षणसम्राट फुलेंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे हा उपक्रम घेण्यात येतो. या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ यांनी विशेष उपस्थिती दर्शवून सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश नीळ यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. दहावीच्या श्रेय सुतार हिने प्रास्ताविक करताना महात्मा फुले यांनी समाजातील वंचितांसाठी केलेल्या शैक्षणिक क्रांतीची आठवण करून दिली.
यानंतर बालवर्ग, माध्यमिक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या कार्यावर, शिक्षणाच्या महत्वावर आणि शिक्षकांच्या भूमिकेवर प्रभावी भाषणे केली. विद्यार्थ्यांच्या सहभागाने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणांनीही रंगत आणली.
आपल्या भाषणात संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ म्हणाले, “ज्यांनी आयुष्यभर एकही शाळा उघडली नाही, त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा करण्याऐवजी ज्यांनी संपूर्ण जीवन शिक्षणप्रसारासाठी अर्पण केले त्या महान महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनाचाच खरा शिक्षक दिन मानला पाहिजे.” त्यांचे हे मत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त टाळ्यांनी दाद देत स्वीकारले.
कार्यक्रमाचा विशेष आकर्षणाचा भाग म्हणजे ‘विद्यार्थी शिक्षक’ उपक्रम. दहावी, नववी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दिवसभर विविध वर्गांमध्ये जाऊन अध्यापनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. गणित, इंग्लिश, मराठी, हिंदी यांसारख्या विषयांचे धडे विद्यार्थ्यांनी आपल्या वेगळ्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला. शिक्षकाची भूमिका निभावताना विद्यार्थ्यांना वर्गशिस्त, शिकवण्याची पद्धत, तसेच अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद कसा साधावा याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
समारोप सत्रात दिवसभर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ‘विद्यार्थी-शिक्षकां’चे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती गुंड हिने तर आभार प्रदर्शन नियती वाकचौरे हिने केले.
या कार्यक्रमासाठी प्राचार्या सुषमा निळ, मुख्याध्यापिका अर्चना आवरादे, शिक्षक वैभव मसलकर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
महात्मा फुले यांच्या प्रेरणादायी कार्याची शिकवण देत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages