विकासाला पाठिंबा म्हणून प्रभाग 1O मधून मेजर तानाजी माने यांनाच विजयी करण्याचा प्रभाग वासियांचा पक्का निर्धार
प्रभागाला 24 तास उपलब्ध होऊ शकणारे नगरसेवक म्हणून मेजर तानाजी माने नक्कीच जबाबदारी पार पाडतील
प्रचारा दरम्यान प्रभागातील मतदारांनी व्यक्त केलेल्या विश्वासामुळे भाजपचे पारडे जड
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- प्रभाग क्रमांक दहा मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मेजर तानाजी माने यांच्या परिवाराच्या संघटन कौशल्यामुळे या प्रभागात दिवसेंदिवस माने यांचा प्रभाव वाढवून त्याचे रूपांतर त्यांना येत्या निवडणुकीत होणाऱ्या मतांमध्ये होताना दिसत आहे. ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांतनाना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचबरोबर माने परिवारातील सदस्यांनी या निवडणुकीतील डोअर टू डोअर प्रचार आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आणला आहे आता प्रभागातील विविध मान्यवरांच्या दुसऱ्यांदा संपर्कात जाऊन या प्रभागातून संधी देण्याची प्रचारात्मक विनंती मेजर तानाजी माने हे करत आहेत.
केवळ माने आणि गाढवे वस्तीवरील मतदारांमध्ये तसेच मोहोळ शहराच्या विद्यानगर सुभाष नगर, बागवान नगर, गवळी प्लॉटिंग, त्याचबरोबर अहिल्यानगर, बागवान नगर, गरड महाविद्यालय परिसर तसेच तक्षशिला सोसायटी मंदाकिनी रेसिडेन्सी, चंद्रलोक पार्क या परिसरात माने परिवाराने पहिल्या दिवसापासूनचा संपर्क आजतागायत कायम ठेवत या निवडणुकीच्या प्रचारातील मोहिमेमध्ये प्रचाराची सर्वांगीण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे डॉ किरण माने यांनी मतदारापर्यंत पक्षाचे चिन्ह कमळ पोहोचवले आहे.
मेजर तानाजी माने यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार शितलताई क्षीरसागर यांनीही या प्रभागातील भाजपच्या ओबीसी महिला प्रवर्गातील उमेदवार आरती प्रशांत गाढवे यांच्या समवेत पदयात्रा आणि जनसंवाद दौरा यशस्वी करत मतदारांमध्ये भाजपाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. येत्या काळात पक्ष स्तरावरून येणाऱ्या विकासाच्या योजना प्रभागात आणण्यासाठी हा प्रभाग भाजपच्या ताब्यात असणे आवश्यक आहे. ही बाब आता प्रभागातील मतदारांना मनोमन पटत आहे.
भाजपाचे मोहोळ शहराचे नगरपरिषद प्रभारी सुशील भैया क्षीरसागर, सोमेशआबा क्षीरसागर त्याचबरोबर भाजप युवा नेते प्रशांत गाढवे, नवनाथ चव्हाण या मंडळींनी प्रचारातील यंत्रणेमध्ये सातत्याने आत्मविश्वास आणि उत्साह कायम ठेवत प्रभागातील भाजपचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
चौकट
भाजपा हा विकास करणारा पक्ष असून विकासासोबत राहण्यासाठी भाजपचा हा बालेकिल्ला आबादित ठेवणे महत्त्वाचे आहे. केवळ निवडणुकीपुरते प्रभागात येणाऱ्यांना मतदार नक्की ओळखतील. माजी आमदार राजन पाटील यांच्या माध्यमातून या प्रभागाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. भाजपा हा पूर्ण ताकतीने विकास करणारा पक्ष असून सर्वजण माझ्या उमेदवारीच्या रूपाने भाजपाला नक्कीच स्वीकारतील.त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी मला दिलेल्या संधीचे सोने विजयाच्या स्वरूपात करण्याचा दृढनिश्चय केल्याचे अधिकृत उमेदवार मेजर तानाजी माने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
.jpg)
0 Comments