सिंहगड प्रशालेच्या विद्यार्थिनीचे प्रेरणा: एक अनुभवात्मक शिक्षण उपक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 3, 2025

सिंहगड प्रशालेच्या विद्यार्थिनीचे प्रेरणा: एक अनुभवात्मक शिक्षण उपक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार

 सिंहगड प्रशालेच्या विद्यार्थिनीचे प्रेरणा: एक अनुभवात्मक शिक्षण उपक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार




सोलापूर येथे शालेय शिक्षण विभागांतर्गत प्रेरणा: एक अनुभवात्मक शिक्षण हा उपक्रम पार पडला. या उपक्रमामध्ये  सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळांनी सहभाग नोंदविला होता. त्यातून मुलाखतीच्या माध्यमातून सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी, पंढरपूरची इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी अक्षरा पुदलवाड हिची निवड झालेली आहे. ही विद्यार्थिनी 1४ डिसेंबर ते २०डिसेंबर पर्यंत होणाऱ्या गुजरात मधील अहमदाबाद येथील प्रशिक्षणासाठी जाणार आहे. या विद्यार्थिनीचे  संस्थेचे अध्यक्ष एम.एन. नवले सर, कॅम्पस डायरेक्टर डॉ .कैलाश करांडे तसेच सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी, पंढरपूरच्या प्राचार्या.सौ. स्मिता नवले, मुख्याध्यापिका सौ. स्मिता नायर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील होणाऱ्या प्रशिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages