श्रीनारद भक्तीसूत्र यावर विवेक घळसासी यांचे अ‍ॅम्फी थिएटरमध्ये निरूपण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 15, 2025

श्रीनारद भक्तीसूत्र यावर विवेक घळसासी यांचे अ‍ॅम्फी थिएटरमध्ये निरूपण

 श्रीनारद भक्तीसूत्र यावर विवेक घळसासी यांचे अ‍ॅम्फी थिएटरमध्ये निरूपण



शुक्रवार 17 पासून सकाळी 6.25 वाजता  
सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- नारायणाचे नाम जपत अखंड विश्‍वात गमन करणार्‍या नारदमुनींच्या भक्तीसूत्रांवर ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांचे निरूपण विवेकाची अमृतवाणी यामधून होणार आहे. महाराष्ट्र साहित्र परिषद, शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 17,18,19 ऑक्टोंबर या तीन दिवशी लोकमान्य टिळक सभागृह अ‍ॅम्फी थिएटर मध्ये सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी या निरूपणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे रांनी दिली.
विवेकाची अमृतवाणी गेल्या 15 वर्षापासून दिपावलीपूर्व वैचारिक दिपोत्सव अखंडपणे साजरा केला जातो. विविध विषयावर ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांच्या रसाळवाणीतून निरूपण केले जाते. यंदाच्या वर्षी श्रीनारद भक्तीसूत्र या विषयावर ते बोलणार आहेत. दीपावलीपूर्व बौध्दिक मेजवाणी देण्याच्या या परंपरेतून महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या वतीने हा वैचारिक दिपोत्सव साजरा करण्यात येत असून यासाठी पु ना गाडगीळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. दिवाळी पूर्वीची पहाट चांगल्रा विचाराने सुरू व्हावी दिवाळीची सुरूवात मंगलमय वातावरणात बौध्दिक मेजवानीने विवेकाच्या अमृतवाणीमधून केली जात आहे. यापुर्वी प्रभु श्रीराम, महाबली हनुमान, श्रीकृष्ण, चाणक्य, रामायण, महाभारत यावर प्रवचन करण्यात आले असून या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद देत सभागृहात मोठ्यासंख्रेने गर्दी केली होती. विवेक घळसासी यांच्या रसाळवाणीतून आलेल्या  प्रत्येक विषयाचे निरूपण ऐकून रसिक श्रोते मंत्रमुग्ध होतात. दिवाळीतील गोड फराळाचा आनंद घेण्रापूर्वी बौध्दिक विचारांची मेजवाणी विवेकाची अमृतवाणी यातून मिळते.  
 सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी विवेक घळसासी यांचे निरूपण वेळेवर सुरू होऊन वेळेवर सकाळी 7.30 वाजता संपणार आहे. तरी या मंगलमय बौध्दिक आणि वैचारीक मेजवानी असलेल्या विवेकाची अमृतवाणी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने  उपस्थित राहावे,असे आवाहन मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांच्याकडून करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages