आटपाडीकरानों ! सादिकभाई खाटीक यांनाच नगराध्यक्ष करा .
समविचारी पक्ष, संघटनांनी सादिक खाटीक यांच्या नेतृत्वाखाली लढावे .
बाळासाहेब मेटकरी पंच - शुभम वसंतराव हाके यांचे आवाहन .
आटपाडी (कटुसत्य वृत्त):-
स्वच्छ, पारदर्शक पाण्यासारखे ज्यांचे कार्यकर्तृत्व चार दशके राज्यभर गाजत राहीले, ते आटपाडीचे सर्वसंपन्न व्यक्तीमत्व सादिकभाई खाटीक हे आटपाडीच्या पहिल्या नगराध्यक्षपदी विराजमान व्हावेत . असे आमच्या सारख्या शेकडों कार्यकर्त्याना वाटते आहे . असे मत आटपाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बाळासाहेब लक्ष्मण मेटकरी, आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे आटपाडी तालुका अध्यक्ष शुभम वसंतराव हाके यांनी व्यक्त केले आहे .
आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रीक निवडणूकीसाठी नगराध्यक्ष, नगरसेवक यांचे आरक्षण निश्चित झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक्स मिडीया, सोशल मिडीयावर आपल्या भावना व्यक्त करण्याच्या भूमिकेतून बाळासाहेब मेटकरी, शुभम हाके बोलत होते .
आटपाडी नगरपंचायतीच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, काँग्रेस आय, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, या समविचारी पक्ष आणि अन्य समविचारी संघटनांनी सादिक खाटीक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी . आटपाडीचे नागरीक या समविचारी पक्ष - संघटनेच्या पॅनेलला प्रचंड मताधिक्क्याने विजयी करतील . असा आत्मविश्वास बाळासाहेब मेटकरी, शुभम हाके यांनी प्रारंभीच व्यक्त केला .
आटपाडी ग्रामपंचायतीच्या शेवटच्या निवडणूकीत एका गटाच्या १६ जागा बिनविरोध झाल्या असताना १७ व्या जागेसाठी विरोधात लढणाऱ्या आणि ती जागा मोठ्या फरकाने जिंकणाऱ्या बाळासाहेब मेटकरी या युवकाने मोठी धमाल उडवून दिली होती . तर आपल्या सामाजीक कार्याने गत दशक शेकडोंच्या अंतकरणात घर करणारे शुभम वसंतराव हाके यांनी सादिक खाटीक यांच्याविषयीच्या आपल्या ओतप्रोत भरलेल्या भावना यानिमित्ताने मोकळ्या केल्या .
गेली ४ दशके आटपाडी शहर , आटपाडी तालुका, माणदेश, राज्य आणि केंद्रस्तरावरील शेकडो प्रश्नांवर आवाज उठविणारे, असंख्य जटील प्रश्न सोडविणारे सादिकभाई खाटीक हे माणदेशाचे खरे भुषण आहेत . समाजातल्या विविध क्षेत्रात सर्वस्व झोकून काम करणारे सादिकभाई हजारोंच्या अंतःकरणात स्थान मिळविणारे व्यक्तीमत्व बनले आहेत . आटपाडी तालुक्याच्या परिपुर्ण इतिहासाचा खरा अभ्यासक, जाणकार म्हणूनही त्यांची खास ओळख आहे .
आटपाडी सारख्या भिन्न धर्मीय, भिन्न जातीच्या लोकांनी खचाखच भरलेल्या शहरात पाण्यासारखे सर्वात मिसळून जाणारे , सर्वांना आपलेसे करणारे, सर्वांचे चांगले भले अर्थात चांगभले व्हावे म्हणून तीळ तीळ तुटणारे सादिकभाई , आटपाडीचे नगराध्यक्ष झाल्यास खऱ्या अर्थाने त्यांचा व आटपाडी शहराचा मोठा गौरव होईल .
क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडींच्या शेतीसाठीचे पाणी चळवळीच्या पायातले दगड बनण्याचे भाग्य लाभलेल्या सादिकभाई खाटीक यांचे पाणी लढ्यातले योगदान मोठे आहे . १४५ वर्षापासून सातारा जिल्ह्यात असणारा आटपाडी तालुक्यातल्या राजेवाडीतला म्हसवड तलाव, सांगली जिल्ह्याकडे वर्ग व्हावा . तलावाचे नाव राजेवाडी तलाव असे केले जावे. या व अन्य प्रश्नांसाठी सादिकभाईंनी उठविलेला आवाज राज्याचे लक्ष वेधणारा आणि निर्णायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे . ९ ऑगस्ट २०१९ या क्रांतीदिनी अनेक पत्रकार बांधवांच्या समवेत सादिकभाईनी उठवलेला, पावसाळ्यात नद्यांच्या पुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी तालुक्यांना देण्या संदर्भातला आंदोलनातला आवाज सत्कारणी लागला आहे .
आमदार, खासदार, नामदार होण्याची क्षमता असलेल्या सादिकभाईंची आटपाडीच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्यास आटपाडी शहराचा डंका देशभर - जगभर वाजल्याशिवाय राहणार नाही . एक पंचवार्षीक मध्येच अनेक पंचवार्षीकचा विकास साधण्याची प्रचंड क्षमता असणारे सादिकभाई !, आटपाडी शहराच्या प्रचंड, चौफेर आणि सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र दणाणून सोडल्याशिवाय राहणार नाहीत . आटपाडी शहर आणि आटपाडी तालुक्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला सादिकभाई, सळो की पीळो केल्याशिवाया राहतील असे वाटत नाही . असा आम्हांला ठाम विश्वास आहे . भल्या भल्यांना घाम फोडणाऱ्या या अवलियाने आपल्या उच्च कोटीच्या नैतिक कार्याच्या वाटचालीच्या जोरावर अनेक नाठाळांची पळता भुई थोडी केली आहे . राज्यातील सर्व क्षेत्रातील शेकडो मान्यवरांच्या गळ्यातला ताईत बनलेल्या सादिकभाई खाटीक यांच्या प्रचंड कार्याला राज्यातूनही मोठे साथ समर्थन मिळणार आहे .
अत्यंत कल्पक, सखोल, अभ्यासू वृत्तीच्या सादिकभाई खाटीक यांच्यासारखे, जमिनीवरील इमानदार, प्रामाणीक, ध्येयवेडे आणि जिगरबाज नेतृत्व आटपाडीसाठी लाभावे, हीच आमची अंतरीची इच्छा आहे . आम्हांला दैवतासमान असलेले माजी आमदार कै . कै . आण्णासाहेब लेंगरे, माजी सभापती कै . धुळाजी झिंबल साहेब यांच्या कार्यकर्तृत्वावर जीवापाड प्रेम करणारे आणि राज्याचे माजी मंत्री, राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री . महादेवराव जानकर यांचे परमशिष्य असलेले आम्ही दोघे, ( बाळासाहेब मेटकरी, शुभम हाके ) सादिकभाई खाटीक या धर्मातीत माणसांसाठी जाहीररित्या साथ समर्थन देत त्यांच्यासाठीची नगराध्यक्ष पदावर निवडी संदर्भाची जाहीर मागणी तमाम शहरवाशीयांकडे करीत आहोत . असेही बाळासाहेब मेटकरी, शुभम हाके यांनी शेवटी स्पष्ट केले .
0 Comments