राजराजेश्वरीच्या स्काऊट गाईड तर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात
सोलापूर (कटुसत्य वृत्त):-
सोलापूर शहर जिल्हा भारत स्काऊट्स आणि गाईड्स कार्यालयाच्यावतीने 'चला पुरग्रस्तांची दिवाळी गोड करु' या उपक्रमांतर्गत पुरग्रस्तांसाठी मदतीचा आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनानुसार विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक व माध्यमिक प्रशालेतील कब बुलबुल पथक, स्काऊट गाईड पथक, सर्व शिक्षक व शिक्षिकांनी विनायक नगर, सिद्धेश्वर नगर, निलम नगर,बोळकोटे नगर, श्रमजीवी नगर,अरफात नगर,विजय नगर,न्यु मल्लिकार्जुन नगर येथे प्रभात फेरी काढून सर्व पालकांच्या मदतीने २५ क्विंटल तांदूळ, दोन क्विंटल डाळ, तीन पोते साखर, एक पोते गहू, एक पोते ज्वारी तसेच रोख रक्कम स्वरुपात ३१०० ची मदत मिळविले.सोलापूर शहर जिल्हा स्काऊट गाईड कार्यालयातील जिल्हा स्काऊट संघटक श्रीधर मोरे , वरिष्ठ लिपिक राठोड यांच्याकडे सुपूर्द केले.स्काऊट गाईडच्या चळवळीत मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, स्काऊटर हणमंत कुरे, अमोल गुड्डेवाडी, रविकांत पोतदार,चंद्रकांत पाटील,गाईड कॅप्टन वैशाली गुजर, सुजाता फुलारी,शितल चमके, उज्ज्वला भांड यांनी महत्वपूर्ण योगदान दिल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
चौकट
एक हात मदतीचा
महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांच्या घरातील अन्नधान्य आणि कपडे पाण्यात वाहून गेले. सध्या निवाऱ्याची अडचणी येत आहेत तसेच अनेक विद्यार्थ्यांचे दप्तर हि वाहून गेल्याने शेतकऱ्यांसाठी मतदीचा हात पुढे केल्याने पालकांच्या सहकार्याने उपक्रम यशस्वी राबविता आल्याने मनाला समाधान झाल्याचे मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी सांगितले.
0 Comments