पंढरीत नगरपरिषद निवडणुकीसाठी आ. अवताडे समर्थकांची बैठक
पंढरपूर  (कटूसत्य वृत्त):- आ. समाधान आवताडे हे पंढरपूर मंगळवेढ्याचे आ. झाल्यापासून , त्यांच्या समर्थकांच्या संख्येत वाढ झाली आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे समर्थक रविवारी एकत्र आले. पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत उडी घेण्याचा विचार या समर्थकांनी बोलून दाखवला. आ. अवताडे समर्थकांच्या या बैठकीने पंढरपूर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आ. समाधान आवताडे यांचे अनेक समर्थक नगरसेवक पदाच्या पात्रतेचे आहेत.यापूर्वीही त्यांनी अनेक नगरपरिषद निवडणुका लढवल्या आहेत. अवताडे आ.झाल्यापासून त्यांच्या समर्थकांच्या संख्येत तितकीच वाढ झाली आहे. या समर्थकांच्या भावनेचा आ. अवताडे यांनी विचार करावा . या निवडणुकीत आपणास संधी मिळावी , अशी भूमिका अनेक समर्थकांनी व्यक्त केली.
पंढरपूर नगर परिषदेवर परिचारक गटाची एकहाती सत्ता आहे. यातच परिचारक हेही भाजपा पक्षातच आहेत. यामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीत , आमदार अवताडे समर्थकांना किती न्याय मिळणार  ? हा प्रश्न उपस्थित होत असतानाच , आमदार अवताडे समर्थकांनी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेली स्वतंत्र बैठक, पंढरपूरच्या राजकारणात मोठा चर्चेचा विषय ठरली आहे. अवताडे समर्थकांना पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत ,सामावून घेणे परिचारकांना क्रमप्राप्त आहे. परंतु परिचारकांनी डावलले तरीही , ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवायचीच , अशी आग्रही भूमिका या समर्थकांनी घेतली. आ. अवताडे समर्थकांची ही बैठक पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत कोणता करिश्मा साधणार याकडे , सबंध तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
 पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या या बैठकीस सुनील डोंबे, शेखर भोसले ,संतोष डोंगरे , भैय्या कळसे, वैभव फिसलकर,  लखन चौगुले, समाजसेवक संजय बाबा ननवरे, शंकर सुरवसे यांच्यासह अवताडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
 
 
 
 
 
 
.png) 
 
 
0 Comments