Hot Posts

6/recent/ticker-posts

शहर कृती समिती पतसंस्थेच्या पुरस्काराचे वितरण

 शहर कृती समिती पतसंस्थेच्या पुरस्काराचे वितरण




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर कृती समिती शिक्षक पतसंस्थेच्या वतीने, गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण मातोश्री हॉल शेळगी येथे आमदार विजयकुमार देशमुख व माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी बोलताना आमदार देशमुख यांनी शेळगी परिसरातील शैक्षणिक लेखाजोखा मांडला व सोलापूर महानगरपालिकेकडून शहरातील सर्व शाळा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आमदार सावंत बोलताना म्हणाले राज्यात शैक्षणिक क्षेत्रात नवीन आव्हाने उभे राहत असून त्यांना सक्षमपणे प्रतिकार आपण करणार असल्याचे सांगितले. पतसंस्थेचे चेअरमन गुरुनाथ वांगीकर यांनी प्रास्ताविकात पतसंस्थेच्या माध्यमातून शिक्षकांची आर्थिक प्रगती साधणार असल्याचे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन गुरुनाथ वांगीकर, बहुजन शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सरवदे,शहर अध्यक्ष विद्यानंद स्वामी, माजी नगरसेवक चंद्रकांत रमनशेट्टी,पथसंस्थेचे व्हॉइस चेअरमन प्रमोद बतुल सुनील चव्हाण, अब्दुल गफूर अरब, सोमेश्वर याबाजी उपस्थित होते.
यावेळी आदर्श शाळा, आदर्श शिक्षकेतर व शिक्षक कर्मचारी, आदर्श मुख्याध्यापक अशा विविध प्रकारचे पुरस्काराचे वितरण करण्यात आले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे संचालक सरदार नदाफ,  दीपक जळकोटे, मल्लप्पा बिराजदार, बाबासाहेब भेंकी, रमेश यादवाड, धरप्पा हत्तुरे, चंद्रकांत माळी,दिलीप फडतरे,अनुप कस्तुरे,आफरीन सय्यद,स्मिता परवत, यांनी परिश्रम घेतला. सूत्रसंचालन अल्लाउद्दीन शेख यांनी केले, यावेळी शहरातील असंख्य शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments