आर्द्रा शॉपिंग मॉल संपूर्ण कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी - सनी लिओनी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विकास आणि संधी यांच्या माध्यमातून स्थानिक रोजगार निर्माण करणे आणि सोलापुरात एका नवीन अध्यायाची सुरुवात करून जिच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबासाठी आणि कुटुंबातील प्रत्येकासाठी पन्नास हजार चौरस फुटाचे अत्याधुनिक शॉपिंग मॉल उभे केले असल्याचे सुप्रसिद्ध अभिनेत्री सनी लियोनी यांनी व्यक्त केले.
सम्राट चौक येथील नॅशनल हायवे च्या ब्रिज च्या शेजारी आर्द्रा शॉपिंग मॉल ची उभारणी केली आहे याचे शुभारंभ सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री सनी लियोनी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर्द्रा कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड चे प्रमुख विजय अय्यर, शुभम भुतडा, गीता भुतडा, अभिषेक सोनी आदी उपस्थित होते.
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी आर्द्रा शॉपिंग मॉल संपूर्ण कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी असून यात किड्स यंग स्टार्स आणि ड्रेस मटेरियल शूटिंग शर्टींग तसेच भारतातील अग्रगण्य शहरातील सुप्रसिद्ध साड्या येथे एकाच छताखाली उपलब्ध होतील. आर्द्रा शॉपिंग मॉल वन स्टॉप डेस्टिनेशन फॉर शॉपिंग मॉल होईल असे अय्यर यांनी सांगितले.
सोलापूरची निवड ही त्याच्या प्रतिष्ठित चादर आणि सांस्कृतिक वारसाच्या कामगिरीवर जगभर प्रसिद्ध असल्यामुळे आम्ही सोलापूरची निवड केली असे त्यांनी सांगितले. तसेच कर्नाटक, तेलंगाना आणि आंध्र प्रदेश यांच्या सीमावरती भागाशी सोलापूर निगडित आहे आणि देशभरातील नामवंत शहराचे रस्ते आणि रेल्वे चे जाळे खूप मोठे असल्यामुळेच आम्ही वन डेस्टिनेशन फॅशन आर्द्रा मॉल करिता सोलापूरची निवड केली असल्याची कृतज्ञता विजय अय्यर त्यांनी व्यक्त केली.
ते पुढे बोलताना म्हणाले की विकास आणि संधी यांच्या माध्यमातून स्थानिक रोजगार निर्माण करून सोलापुरात एका नवीन अध्यायाची सुरुवात केली आहे. जवळजवळ साडेचारशे प्रतिनिधींना आम्ही या मॉलमध्ये रोजगार मिळवून दिला आहे. फॅशनच्या क्षेत्रात एक नवीन पाऊल आम्ही ठेवले असून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील लोकांनी एक वेळ अवश्य भेट द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
0 Comments