Hot Posts

6/recent/ticker-posts

सयाजीराजे मोहिते-पाटील शिवसृष्टी समितीत सदस्य म्हणून निवड

 सयाजीराजे मोहिते-पाटील शिवसृष्टी समितीत सदस्य म्हणून निवड

     


 


अकलूज (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि.शंकरनगर-अकलूज या कारखान्याच्या नियंत्रणाखाली शिवसृष्टी किल्ला व  शिवछत्रपती मल्टीमेडिया लेजर शो सन २००९ पासून सुरू आहेत.या किल्ल्यामध्ये शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंत ठळक कल्पनांवर २२ शिल्पांच्या माध्यमातून लाईट व साऊंड शोद्वारे शिवसृष्टी साकारण्यात आली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कार्याचे जतन तसेच त्यांचे कार्य तरुणांना प्रेरणादायी ठरावे या बांधिलकीतून सन २००९ पासून हा यादवकालीन भुईकोट किल्ला पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे.नाममात्र प्रवेश शुल्क घेऊन या किल्ल्याची देखभाल व व्यवस्थापन कारखान्याच्या माध्यमातून केले जाते.आज अखेर साधारणतः सोळा लाख पर्यटकांनी या किल्ल्यास भेट दिली आहे.शिवछत्रपती मल्टीमेडिया लेजर शो हा महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातील एकमेव शो आहे.हा शो सर्व सुविधांनी सज्ज आहे. आत्तापर्यंत चार लाख पर्यटकांनी याचा लाभ घेतलेला आहे.शिवसृष्टी किल्ला व संगीत कारंजे याचे कामकाज व नियंत्रण समितीच्या सदस्यपदी शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूजचे सभापती चि.सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे.
           यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील,संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील व संचालक मंडळ,कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.या निवडीबद्दल कार्यक्षेत्रात समाधान व आनंद व्यक्त होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments