Hot Posts

6/recent/ticker-posts

निराधार लाभार्थ्यांना सरसकट अडीच हजाराची अनुदानाची मागणी

 निराधार लाभार्थ्यांना सरसकट अडीच हजाराची अनुदानाची मागणी




पंढरपूर,(कटुसत्य वृत्त):- 
राज्यातील संजय गांधी निराधार योजनेतील लाभाथ्यांना दिव्यांगांप्रमाणे सरसकट अडीच हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती श्रावण बाळ माता-पिता सेवा सामाजिक संघटनेचे राज्य अध्यक्ष तानाजी जाधव यांनी दिली. पंढरपूर तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाकडून सुरू केलेल्या संजय गांधी निराधार योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये इतके अनुदान आजपर्यंत देण्यात येत आहे. दरमहा मिळणारे अनुदान हे आजच्या महागाईच्या काळात कमी आहे. दरमहा बँकेत हेलपाटे मारण्यातच सर्व पैसे खर्ची पडत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे.
योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा  निवृत्तिवेतन योजना व इंदिरा शासनाने राज्यातील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्याचा विचार करून त्यांच्या अनुदानात वाढ करून ते अडीच हजार रुपये करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या योजनेतील निराधार शारीरिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, परित्यक्त्या, देवदासी यांना जाणूनबुजून वाढीव अनुदानापासून शासनाने वंचित ठेवल्याचा आरोप तानाजी जाधव यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे.
राज्यातील संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग, श्रावणबाळ सेवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन इत्यादी पाच योजनांचा मिळून संजय गांधी निराधार विशेष सहाय योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. परंतु शासनाने फक्त दिव्यांग या एकाच योजनेच्या अनुदान वाढीसाठी प्रयत्न केला आहे. त्यामुळे राहिलेल्या विविध पात्र योजनेतील लाभार्थ्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. यावेळी प्रशासनास दिलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या असून याची पूर्तता न केल्यास येणाऱ्या कार्तिकी एकादशीला आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. सुधाकर महानवर, कार्याध्यक्ष हरिदास मुजमुले, वारकरी संघटनेचे अध्यक्ष भानुदास बारडोले महाराज, अशोक मोलाने, सुनील जाधव, रामचंद्र वळणे, शिवाजी शिखरे, राजाराम जाधव, वृद्ध नागरिक, महिला उपस्थित होत्या.
Reactions

Post a Comment

0 Comments