Hot Posts

6/recent/ticker-posts

सरस्वती अकॅडमी ऑफ अकौंटन्सीच्या गणपतीला बैलगाडीतून विसर्जन मिरवणुकी द्वारे निरोप

 सरस्वती अकॅडमी ऑफ अकौंटन्सीच्या गणपतीला बैलगाडीतून विसर्जन मिरवणुकी द्वारे निरोप




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- साखर पेठ येथील प्रा. मल्लिकार्जुन परळकर संचलित सरस्वती अकॅडमी ऑफ अकौंटन्सी च्या गणरायांना बैलगाडीतून विसर्जन मिरवणुकीद्वारे भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.  प्रतिवर्षाप्रमाणे सरस्वती अकॅडमी ऑफ अकौंटन्सी मध्ये यावर्षीही श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली होती. गणेशोत्सवा दरम्यान दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते श्री ची महापूजा करण्यात आलेली होती. व बौद्धिक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले होते.
गणेश विसर्जना दिवशी सकाळी 8 वाजता गणेशाची आरती करून साखर पेठ येथून बैलगाडीतून गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. यामध्ये दोन्ही बैलांना रंग लावून, बैलांना साज चढवून, बैलगाडीची सजावट करून, श्री गणेश मूर्ती बैलगाडी मध्ये ठेवून ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर्व विभाग मध्यवर्ती मार्गातून निघालेल्या या मिरवणुकी द्वारे गणेशाचे विसर्जन दुपारी 12 वाजता सिद्धेश्वर तलाव येथे करण्यात आले.
Reactions

Post a Comment

0 Comments