इस्त्री साठी दिलेल्या कपड्यात मिळालेले दागिने केले परत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री विलास विठ्ठल सरफळे, वय वर्षे 63, रा. मल्लिकार्जुन नगर, स्वागतनगर जवळ, कुमठा नाका, सोलापूर हे टेक्सटाईल मध्ये बत्तीस वर्षे नोकरी करून सध्या सेवानिवृत्त आहेत. ते सध्या इस्त्रीचे दुकान चालवतात. युवराज विशाल डिगे, स्वागतनगर, कुमठा नाका, सोलापूर यांनी त्यांच्याकडे कपडे इस्त्री साठी दिले होते. त्यामध्ये अर्धा तोळे सोन्याच्या दोन अंगठ्या, साडेतीन तोळ्याची चांदीची साखळी खिशामध्ये होती. त्यानी सर्व दागिने परत दिले. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
0 Comments