Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते शहरात पारंपारिक वाद्य वाजवून गणेशाला निरोप

 नातेपुते शहरात पारंपारिक वाद्य वाजवून गणेशाला निरोप




 विसर्जनासाठी चोख पोलीस बंदोबस्त 

नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते शहरातील गणेश विसर्जन सोहळ्यात या वर्षी पारंपरिक वाद्यांचा उत्साह शिगेला पोहोचला, कारण नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या आदेशाने सर्व गणेश मंडळाची बैठक घेऊन डीजे बंदी बाबत मार्गदर्शन केले होते. त्यामुळे ढोल-ताशा, सनई आणि इतर पारंपरिक वाद्यांना महत्त्व प्राप्त झाले. नातेपुते शहरातील व परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी डीजे ऐवजी ढोल, ताशा, सनई, चौघडा, डफडी, हलगी आणि पारंपरिक संगीताचा वापर करून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अश्या जयघोषात आणि भक्तीमय वातावरणात विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या या मिरवणुकीमध्ये शिवसाई गणेश, छत्रपती गणेश, आझाद गणेश, श्रीकृष्ण प्रतिष्ठान, लोकमान्य टिळक, हनुमान गणेश, श्रीगणेश प्रतिष्ठान, त्रिमूर्ती गणेश, सहयाद्री गणेश, श्रीमंत मल्हारहोळकर गणेश, जयभवानी प्रतिष्ठान, जय भवानी तरूण, शंकरनगर गणेश, अहिल्यादेवी प्रतिष्ठान, सटवाई माता गणेश उत्सव मंडळ असे अनेक गणेश मंडळे गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीमध्ये शिवाजी महाराज दरबार, संभाजी महाराज बलिदान, पोलीस मदत कार्य, तुकाराम महाराज, पिंगळा, महादेवी हत्ती, बाल शिवाजी असे अनेक सामाजिक देखावे मंडळांनी तयार केले होते. मिरवणूक मार्गावर नातेपुते नगरपंचायतीचे  व शिवसेना शिंदे गटाचे असे दोन स्टेज मंडळाच्या स्वागतासाठी तयार करण्यात आले होते. नगरपंचायतीच्या स्टेजवर नगराध्यक्षा अनिता लांडगे,  माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,  उपनगराध्यक्ष अतुल पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे माळशिरस पंचायत समितीचे मा. सदस्य माऊली पाटील, सपोनी म हारुद्र परजणे, अॅड. शिवाजीराव पिसाळ, नगरसेवक आण्णासाहेब पांढरे, रणजित पांढरे, अविनाश दोशी, रावसाहेब पांढरे, उद्योजक अतुल बावकर, नंदकुमार लांडगे, संदिप ठोंबरे, आप्पासाहेब भांड, गणेश उराडे, संजय उराडे तसेच शिवसेना शिंदे गटाच्या स्टेजवर शिवसेनेचे तालुका प्रमुख सतीश सपकाळ, निखिल पलंगे, बादल सोरटे, दत्ता माय, एकनाथ करचे स्वागतासाठी उपस्थित होते. नातेपुते शहरातील महिला व पुरुष मंडळींनी मोठ्या संख्येने गणेश मंडळांनी केलेले देखावे पाहण्यासाठी गर्दी केली होती. विसर्जन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत दिघे यांनी ५१ पोलीस कर्मचारी, ३० गृहरक्षक दलाचे जवान व ३ पोलीस अधिकारी असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही तंटा न होता शांततेत सर्व गणेश मंडळांनी गणेश मूर्तीचे विसर्जन केले. नातेपुते शहरात प्रथमच विना डीजे व पारंपारिक वाद्यात सर्व गणेश मंडळांनी देखाव्याची मिरवणूक काढल्याने नातेपुते शहरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments