मुमताज नगर येथे एस.एम. फाउंडेशन तर्फे पैगंबर जयंती उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 9, 2025

मुमताज नगर येथे एस.एम. फाउंडेशन तर्फे पैगंबर जयंती उत्साहात साजरी

 मुमताज नगर येथे एस.एम. फाउंडेशन तर्फे पैगंबर जयंती उत्साहात साजरी





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त मुमताज नगर येथील एस.एम. फाउंडेशन च्या वतीने धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
 प्रति वर्षाप्रमाणे मुमताज नगर येथील एस एम फाउंडेशन च्या वतीने याही वर्षी पैगंबर जयंतीनिमित्त शुक्रवार 5 सप्टेंबर रोजी संध्याकाळी मदनी मदरसा मधील व परिसरातील समाजातील मुला मुलींसाठी धार्मिक मेळावा आयोजित केला होता. कार्यक्रमात तब्बल 50 स्पर्धक मुला मुलींनी भाग घेतला होता. यातून 10 मुला मुलींनी बाजी मारली. यातील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक शालेय साहित्य व स्टील डबा बक्षीस म्हणून देण्यात आला त्याचबरोबर स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वच स्पर्धक मुला-मुलींना देखील पाहुण्यांच्या हस्ते शालेय साहित्य स्टील डबा देण्यात आला.
         यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सायरा शेख ,अनिसा पटेल, नसिमा शेख ,डॉ आतिया सिद्दीकी यांची उपस्थिती होती. त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी निलोफर शेख, फरजाना मुजावर यांनी प्रशिक्षकाची (जजेस) भूमिका पार पाडली व विजेत्यांची निवड केली. कार्यक्रमाची रूपरेषा व प्रस्तावना कुमारी मदीहा इरफान मुजावर व महेक अल्ताफ मुजावर यांनी मांडली. या कार्यक्रमाला परिसरातील महिला आपापल्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकंदर जशने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त आयोजित केलेला हा धार्मिक (जलसा) प्रवचनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
         कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस एम फाउंडेशन चे अध्यक्ष शब्बीर नौशाद मुजावर, मदनी मदरस्याच्या प्रमुख निशाद (आपा) मुजावर व फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages