सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असून याची तयारी अंतिम टप्यात आहे. या अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा नुकतीच पार पडली असून तालुकास्तरीय कार्यशाळा सात ठिकाणी घेण्यात आली आहे. आता १५ सप्टेंबरला ग्रामस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामपंचायती सक्षम करण्याबरोबरच केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी
राज्यभर हे अभियान राबविण्यात येणार असून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षिसे देण्यात येणार आहेत. शासनाचे हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली असून तालुकास्तरीय कार्यशाळा सात ठिकाणी घेण्यात आल्या असून चार ठिकाणी येत्या दोन
दिवसात या कार्यशाळा होतील. त्यानंतर ग्रामस्तरावर १५ सप्टेंबर रोजी अशा प्रकारची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वच ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याशी ऑनलाइन पध्दतीने संवाद साधणार आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती यात सहभागी होतील. मात्र, अभियान प्रभाविपणे राबवत असलेल्या जिल्ह्यातील २२० ग्रामपंचायतींची निवड पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. यातून यशस्वी ग्रामपंचायतींना बक्षिसे दिली जातील, असेही जंगम यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत
विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ उपस्थित होते.
चौकट 1
तेव्हाच शिक्षकांना कार्यमुक्त करणार
ऑनलाइन पध्दतीने शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत जिल्ह्यातील ५४ शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत. तर १७४ शाळा एक शिक्षकी झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ज्या शाळेत शिक्षक नाहीत तेथे शिक्षकांचे समायोजन तर ज्या एक शिक्षकी शाळा आहेत त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध करून बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी सांगितले.
घरकूलप्रकरणी दहा ग्रामसेवकांना नोटिसा
घरकूल बांधकामाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील प्रत्येकी पाच अशा दहा ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण न करणे, घरकुलाच्या दिलेले हप्त्यानुसार काम न करणे असा ठपका या ग्रामसेवकांवर ठेवण्यात आला आहे.
चौकट 2
अतिरिक्त पदभरती
२०१९ ते २०२१ या कालावधीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांतून दहा टक्के पदभरती करणे आवश्यक होते. मात्र अतिरिक्त पदे भरण्यात आल्याने ग्रामपंचायत कर्मचान्यांच्या कोट्यातून नवीन भरती करता येत नसल्याचे जंगम यांनी सांगितले.
ग्रामसेवकावर कारवाई
कुई अवैध मुराम उपसा प्रकरणी अहवाल प्राप्त झाला असून एफआयआर दाखल झाल्याची कॉपी प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितले.
0 Comments