स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कार्यशाळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 3, 2025

स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कार्यशाळा

                          स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कार्यशाळा



पंढरपूर :(कटूसत्य वृत्त):-  गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागामार्फत 'अॅडव्हान्स्ड इंडस्ट्रियल ऑटोमेशन कंट्रोल' या विषयावर दोन आठवड्यांची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी इंडस्ट्रियल ऑटोमेशन इंडस्ट्रीची रचना, फील्ड डिव्हाइसेसची माहिती कंट्रोलर्सची ओळख तसेच पीएलसी विरुद्ध मायक्रोकंट्रोलर यांची सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून हिमांशू कुमार हे लाभले होते. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल ऑटोमेशन क्षेत्रातील सखोल ज्ञान मिळाले. तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे औद्योगिक कौशल्य विकसित झाले. 
ही कार्यशाळा स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने, उपप्राचार्या डॉ. मीनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली झाली. या कार्यशाळेत अंतिम वर्षातील १४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. शशिकांत कांबळे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन डॉ. एन. पी. कुलकर्णी यांनी केले तर कार्यशाळेचे आभार विभागप्रमुख डॉ. सुमंत आनंद यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages