Hot Posts

6/recent/ticker-posts

आरक्षण आंदोलनाचा विजय; करमाळ्यात आनंदोत्सव साजरा

 आरक्षण आंदोलनाचा विजय; करमाळ्यात आनंदोत्सव साजरा



करमाळा,(कटूसत्य वृत्त):- मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे- पाटील यांनी मुंबई येथे सुरू केलेल्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर करमाळा शहर आणि तालुक्यात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज आणि बहुजन बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते.
येथील छत्रपती चौकात जमलेल्या युवकांनी आनंद व्यक्त करत जल्लोष साजरा केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर गुलालाची उधळण करत हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यात आला. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थं जोरदार
घोषणाही देण्यात आल्या. २९ ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला करमाळा शहर आणि तालुक्यातून प्रचंड पाठिंबा मिळाला होता. आजअखेर त्यांच्या मागण्या मान्य झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments