समृद्ध पंचायतराज अभियानात पुढाकार घ्या - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 8, 2025

समृद्ध पंचायतराज अभियानात पुढाकार घ्या

 समृद्ध पंचायतराज अभियानात पुढाकार घ्या



अक्कलकोट, (कटूसत्य वृत्त):- गावांचा खरा विकास फक्त प्रशासनाच्या जबाबदारीवर सोपवून चालणार नाही. प्रत्येक गावकरी सहभागी झाल्यावरच स्वच्छ, हरित व समृद्ध गाव घडवता येईल. शासनाने आखलेल्या योजनांचा लाभ शेवटच्या कार्यशाळा माणसापर्यंत पोहोचवून त्याचा सकारात्मक परिणाम घडवणे हीच खरी विकासाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे सर्वांनी या अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास य पंचायतराज विभागांतर्गत आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा अक्कलकोट येथे आमदार कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी ते बोलत होते. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या या कार्यशाळेत अधिकारी, पदाधिकारी, सरपंच ग्रामसेवक, ग्रामविकास कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यशाळेत पुढे बोलताना आमदार कल्याणशेट्टी यांनी ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले, त्यांनी स्वच्छ व हरित गाव निर्माण करण्यावर भर देत शिक्षणाचा दर्जा उंचावणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे, महिला व युवकांना प्रोत्साहन देणे, तसेच शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन गावपातळीवर सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास विकासाची गती वाढेल आणि त्याचा थेट फायदा प्रत्येक नागरिकाला मिळेल. असे ते म्हणाले.
कार्यशाळेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, अतिरिक्त गटविकास अधिकारी अमर दोडमणी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपअभियंता उषा विडला यांच्यासह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामविकास कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यशाळेत सादर झालेल्या विचारांमुळे तालुक्यातील गावांचा विकास आराखडा ठोसपणे पुढे जाण्यास मदत होईल, अशी भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages