Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉल्बीमुक्त वातावरणात गणरायाला भक्तिमय निरोप

 डॉल्बीमुक्त वातावरणात गणरायाला भक्तिमय निरोप



सोलापूरकरांच्या चळवळीला गणेशोत्सव मंडळांचा अभूतपूर्व प्रतिसाद; पारंपरिक वाद्यांचा निनाद घुमला
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- कर्णकर्कश डॉल्बी बंदीसाठी डीजेमुक्त सोलापूर कृती समिती आणि सजग सोलापूर या संघटनांनी सुरू केलेल्या चळवळीला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांचा अभूतपूर्व व ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला. गेल्या काही वर्षांत प्रथमच डॉल्बीमुक्त वातावरणात श्री गणरायाला पारंपरिक वाद्यांच्या निनादात व भक्तिमय वातावरणात शनिवारी निरोप देण्यात आला. प्रशासनाने
काढलेल्या डॉल्बी आणि लेझर लाइट बंदी आदेशाचे सर्वच गणेशोत्सव मंडळांनी पालन केले. यंदाच्या मिरवणुकीत कुठेही कानबधीर होतील, असा आवाज नव्हता. लेझीम, झांज, ढोल, सनई वाद्यांच्या मंजूळ निनादात विघ्नहत्य श्री गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. डॉल्बीमुक्त वातावरणात निघालेल्या पथदर्शी या मिरवणुकीचा आदर्श वर्षभरात साजरा होणाऱ्या सर्वच सण, उत्सव, जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमांमध्ये अंमलात आणावा लागणार आहे.
सार्वजनिक मध्यवर्ती
१९ तासांच्या मिरवणुकीनंतर आजोबा गणपतीचे विसर्जन
लेझीम, झांज, ढोलपथक, शक्तिप्रयोग
आजोबा गणपतीसह सुमारे  बीस ते पंचवीस मंडळांच्या बहारदार लेझीम, झांज, ढोलपथक, शक्तिप्रयोग दांडपट्ट्याचा मदांनी खेळ, गुलाल, फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी भगवा झेंडा फडकवित गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या उत्साहात श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. १९ तासांच्या मिरवणुकीनंतर आजोबा गणपतीचे श्री सिध्देश्वर तलावातील कल्याणी कुंड (विष्णू घाट) येथे विसर्जन करण्यात आले.
स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मिरवणुकीत पंचवीस ते तीस मंडळांनी सहभाग घेतला होता. या मिरवणुकीचा प्रारंभ देशमुख यांच्या श्री गणरायाच्या मूर्तीचे दक्षिण कसबा येथील देशमुख वाडयात वतनदार सोमशंकर, सुधीर, सुदेश, आमदार विजयकुमार व डॉ. किरण या देशमुख परिवारासह वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांच्या हस्ते आरती व पूजन करण्यात आले.
१९ तासांच्या मिरवणुकीनंतर आजोबा गणपतीचे श्री सिध्देश्वर तलावातील कल्याणी कुंड येथे
विसर्जन करण्यात आले. ढोल- ताशांच्या गजरात, मदांनी खेळ, लेझीमचा खेळ सादर करत ही
मिरवणूक लक्षवेधी ठरली. मुला मुलींचे ढोलपथक, लेझीमपथक या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
आजोबा गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती. मिरवणूक मार्गावर
१२ फुटी, १५ फुटी फुलांचे हार, नवसाचे पेढे, मोदक, चुरमुरे गुलालाची उधळण करत भक्तीला
उधाण आले होते. पाणीवेस तालीम गणेशोत्सव मंडळाच्यावतीने दत्त चौक येथून विसर्जन मिरवणूक
काढण्यात आली. पाणीवेस तालीमचे चंद्रकांत वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दमदार लेझीमचा डाव सादर करून लक्ष वेधून घेतले.
विविध फुलांची सजावट केलेल्या पालखीतून श्रींची मिरवणूक दुपारी दोन वाजता देशमुख वाड्यातून निघाली. दत्त चौक, राजवाडे चौक, नवी पेठ, गंगा विहीर, चौपाड़, बालाजी  मंदिर येथे आल्यानंतर दुपारी तीन वाजता पोलीस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त विजय कवाडे, आमदार देशमुख, राजशेखर हिरेहब्बू, दिलीप कोल्हे आदींच्या हस्ते पालखीतील 'श्री' च्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. त्यानंतर बाळीवेस टेलिफोन भवन, मंगळवार पेठ पोलीस चौकी, सराफ बाजार, मधला मारुती माणिक चौक, सोन्या मारुती, दन चौक मार्गे गणपती घाट मानाचा देशमुखांचा गणपती तर आजोबा गणपती मूर्तीचे विसर्जन लक्ष्मी मार्केट समोर असलेल्या श्री विष्णू मंदिरजवळ विष्णू पाटावर सकाळी सात वाजता ट्रस्टी अध्यक्ष आमदार देशमुख यांच्या हस्ते विधिवत धार्मिक कार्याने करण्यात आले. सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाचे बसवराज येरटे, सोमनाथ मेंडके, सुनील रसाळे, दास शेळके, संजय शिंदे, विजय पुकाळे, अंबादास गुतीकोंडा, गौरव जक्कापुरे, अनिल गवळी, मल्लिनाथ बाळगी, लता फुटाणे आदी आजी, माजी पदाधिकारी उपस्थित होते.. थोरला मंगळवेढा तालीम गणेश उत्सव मंडळाच्या मिरवणुकीस दत्त चौकातून सुरूवात झाली. पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या हस्ते गणपतीची पूजा करण्यात आली. यावेळी पोलीस उपायुक्त कवाडे व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आदी उपस्थित होते. या मिरवणुकीत ७०० हून अधिक कार्यकत्यांनी ढोल-ताशांच्या तालावर लेझीमचे मर्दानी डाव सादर केले. समर्थ तरुण मंडळाच्या मिरवणुकीची सुरुवात लकी चौकातून झाली. या मिरवणुकीत कार्यकत्यांनी बहारदार लेझीम खेळून मन जिंकले. यावेळी मानाचा शेठजी गणपती, बाळीवेस गणपती, सावजी गणपती, राणा प्रतिष्ठान, विश्व गणपती पथक, विजापूर वेचा राजा मंडळ, जयशंकर मंडळाच्यावतीने बहारदार लेझीम सादर केले. तसेच विश्वविनायक प्रतिष्ठान, शिवशक्ती मित्रमंडळ ओम मित्रमंडळच्यावतीने आकर्षक ढोल सादर करण्यात आले  या मिरवणुकीत टिळक चौक मंडळाच्यावतीने महाकाल देखावा सादर केले होते तर लाल आखाडा तालीमने केरळहून खास वाजंत्री मागविले होते.
Reactions

Post a Comment

0 Comments