स्टेज उभारण्याचे कारण पोलिसांशी हुज्जत घातल्याने काळजेंसह ६० जणांवर गुन्हा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 8, 2025

स्टेज उभारण्याचे कारण पोलिसांशी हुज्जत घातल्याने काळजेंसह ६० जणांवर गुन्हा

स्टेज उभारण्याचे कारण पोलिसांशी हुज्जत घातल्याने काळजेंसह ६० जणांवर गुन्हा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- 
सातरस्ता येथे गणपती मंडळाच्या स्वागत कक्षासाठी स्टेज उभारण्याच्या कारणावरुन पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्यासह ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस हवालदार जाधव त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनीष काळजे, सुमीत मन्सावाले, वेणू श्रीनिवास, मुस्ताक शेख, निलेश लंगडेवाले, अमोल डोलारे, जीवन नावाचा मंडप कॉन्ट्रॅक्टर व ५० ते ६०
लोक यांच्याविरुध्द सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
४ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास सातरस्ता येथील शिवसेना भवनाजवळ काळजे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वागत कक्षासाठी अनधिकृत व बेकायदेशीर स्टेज उभा केला होता.. या स्टेजला परवानगी नाकारण्यात आली असताना काळजे व अन्य आरोपींनी पोलिसांशी हुज्जत घातली व स्टेज काढणार नाही अशी भूमिका घेऊन पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करून फोन करून परिसरातील नागरिकांना बोलावून घेऊन चिथावणी दिली. तसेच सार्वजनिक रस्त्यावर बसून रस्त्यावरील रहदारीस अडथळा करून पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी पोलिसांशी हुज्जत घालून
धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला तसेच पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages