पी. एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘सर्वंकष लैंगिकता शिक्षण कार्यशाळा’ संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आजच्या काळात किशोरवयीन मुलांसमोर शारीरिक, मानसिक व सामाजिक अशा विविध आव्हानांचा सामना करण्याची वेळ येते. अशा वेळी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यावश्यक आहे. याच उद्देशाने पी. एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, एम. आय. डी. सी. चिंचोलीकाटी येथे प्रिसिजन फाउंडेशन व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया (एफपीआय), सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ‘सर्वंकष लैंगिकता शिक्षण कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना किशोरावस्था, वैयक्तिक स्वच्छता, आहार, एचआयव्ही/एड्स, मासिक पाळी, कॅन्सर, जीवनकौशल्ये, बालशोषण प्रतिबंध तसेच गुड टच-बॅड टच यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमासाठी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, सहायक जनसंपर्क अधिकारी वैशाली बनसोडे, एफपीआयचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, अध्यक्ष प्रा. डॉ. एन. बी. तेली व शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा पार पडली.
यावेळी एफपीआयचे कार्यक्रम अधिकारी विरेंद्र परदेशी, स्वप्निल सोनवणे, सत्यभामा कांबळे, उर्मिला बनसोडे व विकी शिवशरण यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच चाईल्ड लाईन 1098 याविषयी सखोल माहिती चाईल्ड लाईनचे अनोज कदम यांनी विद्यार्थ्यांना दिली.
कार्यशाळेदरम्यान सापशिडीचा खेळ व प्रश्नोत्तर सत्रांमधून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व आपल्या शंका दूर केल्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची मोफत हिमोग्लोबिन तपासणीही करण्यात आली.
या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक हबीब नवाज पाटील, मनोज सुधाकर ठोंबरे, राजन सूर्यभान ढवण, शशिकला प्रभाकर कुंभार, गीता महेशकुमार म्हेत्रे, दीपक अनिल गावडे, बापूराव पोपट येजगार, पवित्रा सिद्धाराम मदने व अन्य कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना जीवनासाठी आवश्यक ज्ञान, योग्य दृष्टीकोन व आत्मविश्वास मिळाल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त केले.
0 Comments