मराठा योद्धा पाटलांचा धनगर आरक्षणाला पाठिंबा
जालना (कटूसत्य वृत्त):- मराठा समाजाचे नेते व आंदोलनकर्ते मनोज दादा जरांगे पाटील यांनी आज धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी धनगर समाजाच्या लढ्यात मराठा समाज खांद्याला खांदा लावून उभा राहील, असे स्पष्ट केले.
जालना येथे धनगर समाजाचे मल्हार योद्धा दीपक भाऊ बोराडे हे उपोषणाला बसले असून, त्यांच्याशी मनोज दादा यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी दादांनी त्यांची तब्येत सांभाळण्याचा सल्ला देत 24 तारखेला मराठा समाज मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होईल, अशी ग्वाही दिली.
आंतरवाली येथे धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी मनोज दादा यांची भेट घेतली. या भेटीत दादांनी मराठा समाज आणि धनगर समाज हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगितले. "धनगर समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्हीही शांत बसणार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत," असे ठाम आश्वासन दादांनी दिले.
या वेळी यशवंत संघर्ष सेनेचे संस्थापक विष्णू कुऱ्हाडे, देवाभाऊ मंडलिक, रामराव दादा कोल्हे, भगवानदादा भोजने आणि शिवाजीराव दादा गावडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
0 Comments