Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग 26 मधील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नगरातील समस्या सोडवा

 प्रभाग 26 मधील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नगरातील समस्या सोडवा





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गेल्या तीन चार दिवसापासून सोलापूर शहर जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून त्यामुळे प्रभाग क्रमांक 26 मधील सखल भागातील द्वारका नगर, परमेश्वर नगर,कल्याण नगर भाग 2, हेरिटेज फॉर्म,गुरुदेव दत्त नगर, रत्नमंजिरी नगर,प्रिसिजन कॉलनी, पाटलीपुत्र नगर, बँक कॉलनी, राऊत वस्ती, कोरे वस्ती, स्वामी विवेकानंद नगर, ओम गर्जना चौक, अशा अनेक नगरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्यामुळे ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे सर्वत्र दुर्गंधीयुक्त पाणी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यामुळे मलेरिया, डेंग्यू, हिवतापाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असून व तसेच अनेक नगरातील घरात अद्यापही  पाणी थांबून आहेत त्यामुळे अनेक नागरिक घर सोडून स्थलांतरित झाले आहेत तरी तात्काळ तेथील समस्याचे निराकरण करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना लेखी निवेदन दिले असून निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,
 सदर नगरातील थांबलेले पाणी लवकरात लवकर निचरा करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करणे. 
पाणी थांबल्यामुळे मलेरिया,डेंगू सदृश्य आजार होत आहेत त्यासाठी प्रत्येक घरात निर्जंतुक फवारणी करणे. 
नगरात पाणी आल्यामुळे डांबरी व काँक्रीट रस्ते फोडलेले असून ते परत आहे त्या स्थितीत करून देणे. 
बाधीत नगरात अनेक इलेक्ट्रिक पोल असून त्यावरच्या एलईडी लाईट बंद आहेत ते तात्काळ चालू करून देणे. 
सदर नगरात प्रत्येक पावसाळ्यात  मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने घराघरात पाणी शिरते त्याचा कायमचा बंदोबस्त करणे त्यासाठी 18 इंची ड्रेनेजची लाईन टाकणे.
घरातले घुसलेले दुर्गंधीयुक्त पाणी उपसा करण्यासाठी इलेक्ट्रिक मोटारची संख्या वाढवून ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी. 
अशा विविध समस्या तात्काळ दूर करण्यासाठी प्रत्येक संबंधित विभागास आदेश द्यावेत अशी मागणी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांनी सोलापूर महापालिका आयुक्त डॉ.श्री सचिन ओंबासे साहेब यांना लेखी निवेदन देण्यात आले.
त्याप्रसंगी रुद्रया हिरेमठ काका,वाळवेकर सर, देव मॅडम, आमोणे सर,समर्थ जाधव, आरोळे सर, कोळी साहेब, वंदना वाळवेकर, सुजाता मोडके, रेशमा अमोने, मोहन पाटील,तेजश्री पाटील,सुनीता हिरेमठ,शर्मिला हुल्ले, उमेश चांडोले,
आर्या हेरिटेज फॉर्मचे चेअरमन सुजित कोरे सर, सोमनाथ स्वामी, महारुद्र खुरपे,द्वारका नगर मधील अंबादास कोकरे सर,शिवगणे सर, मंगल लोंढे, ज्योती म्हेतरे,जगदेवी म्हेत्रे, अर्चना कोकरे, माधुरी गायकवाड, संगीता कोळी,शरणामा गवळी, पुजा पारधे, सुवर्णा तळभडारे, वर्षा मरडे, श्रीदेवी पुजारी.पाटलीपुत्र नगर मधुन सौ.शिवगगा जाधव, निलंगगा सोनकांबळे, कांबळे मावशी, तसेच बाधित नगरातील असंख्य महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व आपल्या नरकयातना समस्या सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना समक्ष सांगितल्या.
Reactions

Post a Comment

0 Comments