बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत बैलपोळा सण साजरा
वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- करमाळा तालुक्याच्या पच्छिम भागात भाद्रपद (भादवी) बैलपोळा सण साजरा करण्याचा मुहूर्त असून हा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात बैलांची विद्यिवत पूजा करत गोड पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवनाथ झोळ यांच्या शेतामध्ये बैलपोळा साजरा केला.
हा सण शेती संस्कृतीचा अविभाज्य भाग असून ,बैलांच्या मेहनतीला सलाम ठोकण्याचा हा सोहळा, यादिवशी त्यांना स्वच्छ धुऊन,खांदा मळणी केली जाते. शिंगावरती बेगड लावून,अंगावरती झुल घातली जाते. गळ्यात माळा,रंगबेरंगी अशा प्रकारे बैलांना सजवून पुजा केली जाते. हा सण निसर्गाशी आणि प्राण्यांशी असलेल्या मानवी नात्याला बळकटी देतो.
"कष्टाशिवाय मातीला...आणि बैलाशिवाय शेतीला..." आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या ट्रक्टर युगामध्ये सोशल मीडिया वरून बैलपोळ्याच्या शुभेच्छा देणारा संदेश दिला जातो. पण आधुनिक युगातही बैल पोळा हा सण आपल्या मुळांशी जोडून ठेवतो आणि शेतीच्या महत्त्वाची आठवण करून देवून संस्कृती कायम जिवंत ठेवतो.असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ व्यक्त केले.
0 Comments