सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तेराव्यांदा विक्रम खेलबुडे
सरचिटणीसपदी सागर सुरवसे तर खजिनदारपदी किरण बनसोडे यांची फेरनिवड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तेराव्यांदा विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी सागर सुरवसे यांची तर खजिनदारपदी किरण बनसोडे या दोघांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी 21 सप्टेंबर रोजी संघाच्या कार्यालयात विक्रम खेलबुडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रारंभी सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मागील वर्षाच्या सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले, त्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर खजिनदार किरण बनसोडे यांनी वार्षिक जमा- खर्च सादर केला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
अध्यक्ष पदासाठी पुन्हा विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध निवड करण्याची सूचना किरण बनसोडे यांनी मांडली तर त्यास आप्पासाहेब पाटील यांनी अनुमोदन दिले. विक्रम खेलबुडे यांनी तेराव्यांदा अध्यक्षपदी विराजमान होत नवा इतिहास घडविला.
सर्वांनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहून काम करणार असल्याची ग्वाही नूतन अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी दिली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार देशपांडे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पत्रकार अनिल कदम यांनी काम पाहिले. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील, तरुण भारतचे निवासी संपादक विजयकुमार देशपांडे, पुढारीचे निवासी संपादक संजय पाठक, माजी अध्यक्ष प्रशांत जोशी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत, इन सोलापूरचे चॅनेल प्रमुख समाधान वाघमोडे, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आमदार विजयकुमार देशमुख यांनीही नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे :
उपाध्यक्ष : विक्रम पाठक, आप्पासाहेब पाटील, उमेश कदम, आफताब शेख, नितीन पात्रे, चिटणीस : संगमेश जेऊरे, भरतकुमार मोरे, कालिदास मासाळ, मिलिंद राऊळ,
सहचिटणीस : बळीराम सर्वगोड, दीपक सोमा, अविनाश गायकवाड,
सदस्य : विजयकुमार राजापुरे , अनिल कदम, माधवी कुलकर्णी, व्यंकटेश दोंता, बाळकृष्ण दोड्डी,प्रभूलिंग वारशेट्टी, विठ्ठल आहेरवाडी,रामदास काटकर, प्रीतम पंडित, गौतम गायकवाड, अमोल साळुंखे, विकास चाटी, सचिन जाधव, विकास कस्तुरे , संदीप येरवडे, , मुजम्मिल शहानुरकर, श्रीनिवास मावनूर, सुदर्शन भालेराव.
सल्लागार -नारायण कारंजकर, जयप्रकाश अभंगे, चंद्रशेखर कव्हेकर
*यांच्या अभिनंदनाचा ठराव*
पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाच्या बाह्य सुविधांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सात कोटीचा निधी दिल्याबद्दल तसेच या कामी सहकार्य केल्याबद्दल शिवसेना शिंदे गटाच्या राज्य प्रवक्ता प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या तसेच शिखर पहारिया फाऊंडेशनने श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालय नूतनीकरणासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांच्या
अभिनंदनाचा ठराव या सभेत करण्यात आला.
0 Comments