भिमानगर येथे सोलापूर ग्रामीण पोलीस खात्यामार्फत भूमिहीन मजुरांना अन्नदान
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील भीमानगर वसाहतीमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस खात्यामार्फत भूमिहीन मजुरांना अन्नदान करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब, उपाधिक्षक अंजली कृष्णा,मा कृषी सभापती संजय पाटील भिमानगरकर,एलसीबीचे पीआय संजय जगताप,होम डीवायएसपी नामदेव शिंदे,टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार उपस्थित होते भिमानगर तालुका माढा येथे पारधी,भोई,वडर व इतर समाज हा भूमिहीन असल्यामुळे सध्या महाराष्ट्रात सगळीकडे सर्वदूर पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे गेली महिना झाले या समाजातील लोकांना हाताला काम नाही.तसेच भोई समाजातील लोकांचे सततच्या पुरामुळे मासेमारी करण्यासाठी लावण्यात आलेली जाळी,सापळे पुरा मुळे वाहून गेली आहेत.त्यामुळे याही समाजावर उपासमारीची वेळ आली होती यामुळे सोलापूर ग्रामीण पोलीस खात्यामार्फत या लोकांना अन्नदान देण्यात आले व पोलीस अधीक्षक यांनी यावेळी भिमानगर वसाहतीत अनेक मागास व भूमिहीन समाजाची लोकं राहत असून त्यांच्या जागेचा प्रश्न पालकमंत्र्यांन सोबत मीटिंग लावून सोडवण्याचा शब्द दिला आहे तसेच पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी भिमानगर मध्ये सुशिक्षित बेरोजगारांचा रोजगार मेळावा घेवून नोकरी व रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी भिमानगरसाठी टेलरिंग युनिट उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.
पारधी,भोई,वडर व भुमिहिन समाजाची दखल घेतल्या बद्दल व त्यांच्या अडिअडचणी सोडवण्याचे आश्वासन दिल्याबद्दल मा सभापती संजय पाटील भिमानगरकर यांनी सर्व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे जाहीर आभार मानले.
यावेळी नितीन मस्के, पांडुरंग माने,अक्षय पाटील,विजय पतुले, नेताजी चंबरे,शिक्षण समितीचे अध्यक्ष राहुल सल्ले,अण्णा धोत्रे,राजू चव्हाण व मोठ्या प्रमाणात भिमानगर ग्रामस्थ उपस्थित होते.
.jpg)
0 Comments