पिंपरी येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे योगेश कर्चे यांची निवड
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील मौजे पिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळच्या व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष सदस्य सहीत एकुण १३ पदा करीता मतदान स्वरूपात निवडणूक प्रकिया पार पडली. या निवडणुकीत ९७ पालकांना मतदान करण्याचा हक्क होता, त्यामधून शिवसेना शिंदे पक्षाचे ७ उमेदवार तर भाजपचे ६ उमेदवार निवडून आले.
दरम्यान शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे व कॅबिनेट मंत्री रोहयो फलोत्पादन व खारभुमी विकास मंत्री ना.भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना तालुका अध्यक्ष सतीश सपकाळ यांचे नेतृत्वाखाली पिंपरी गावचे योगेश कर्चे यांची शालेय व्यवस्थापन समिती च्या अध्यक्ष पदी निवड बहुमतानी निवड करण्यात आली. अध्यक्षपदी योगेश कर्चे, उपाध्यक्षपदी बापू सोपान कर्चे सदस्यपदी युवराज ,प्रल्हाद कर्चे, शामराव मारुती कर्चे, चंद्रकला कर्चे, मनीषा कर्चे, कविता शिंदे यांची निवड करण्यात आली.
या निवडीस मार्गदर्शक म्हणून युवक नेते ॲड महेश एकनाथ कर्चे ,नथू नामदेव कर्चे ,युवराज प्रल्हाद कर्चे, विश्वास मधुकर कर्चे, रोहिदास कर्चे, दत्तू कर्चे, सिद्धेश्वर कर्चे, भोजे कर्चे, कृष्णा सोमनाथ कर्चे, शशिकांत कर्चे, धुळा शिंदे, कैलास सोपान कर्चे, मारुती कर्चे, हरिभाऊ कर्चे, बापूराव कर्चे आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या निवडी दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक , सर्व शिक्षक , पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments