पूरग्रस्त मलिकपेठ गावात जिल्हाधिकारी यांची पाहणी ; तातडीच्या मदतीचे निर्देश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 30, 2025

पूरग्रस्त मलिकपेठ गावात जिल्हाधिकारी यांची पाहणी ; तातडीच्या मदतीचे निर्देश

 पूरग्रस्त मलिकपेठ गावात जिल्हाधिकारी यांची पाहणी तातडीच्या मदतीचे निर्देश


 

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे मागील काही दिवसात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी  केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगमतहसीलदार सचिन मुळीक उपस्थित होते. 
 
जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागातील प्रत्यक्ष भेटी दरम्यान ज्या घरांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे नुकसान झाले आहेअशा घरांना दोन दिवसांत प्रत्येकी दहा हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले. 
 
ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी प्रशासनाच्या वतीने पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या फूड पॅकेट्सपिण्याचे पाणीजनावरांसाठी चारा व अन्य मदतीबाबत विचारणा केली. ग्रामस्थांनी प्रशासनाकडून मदत मिळत असल्याचे सांगितले. 
 
यावेळी जिल्हाधिकारी यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या घरी थांबून महिलांशी अत्यंत नम्रतेने संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. व प्रशासन आपल्याला सर्व प्रकारचे मदत करेल असे त्यांनी सांगितले. मलिकपेठ येथील पुलावर जाऊन त्यांनी पाण्याच्या पातळीची माहिती घेतली तसेच झालेल्या नुकसानीचा आढावा तहसीलदारांकडून घेतला. व स्थानिक प्रशासनाने अत्यंत दक्ष राहून सर्व पूरग्रस्तांना मदतीचे काटेकोर नियोजन करावेअसेही त्यांनी सुचित केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages