Hot Posts

6/recent/ticker-posts

पुराने बाधित तालुक्यांना चारा पुरवठा सुरू

 पुराने बाधित तालुक्यांना चारा पुरवठा सुरू


दररोज 100 ते 120 टन चारा उपलब्ध करून देण्यात येणार
 
 
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अतिवृष्टी व पुरामुळे माढा करमाळा मोहोळ उत्तर सोलापूर मंद्रूप दक्षिण सोलापूर करमाळा या तालुक्यात शेती पिकांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या ठिकाणी जनावरांना चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होतापरंतु जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शर्तीच्या प्रयत्नातून इतर जिल्ह्यातून मुरघास हा चारा मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून घेतलेला आहे.
      जिल्ह्यातील बाधित तालुक्यांना आज पासून मुरघास हा चारा जनावरासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये माढा 48 टनमोहोळ 40 टनउत्तर सोलापूर 15 टनमंद्रूप दहा टनकरमाळा पाच टनदक्षिण सोलापूर दोन टन असा चारा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पोहचला आहे तसेच यापुढेही दररोज 100 ते 120 टन मुरघास चारा उपलब्ध करून दिला जाणार आहेअशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.
     प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयापासून प्रत्येक बाधित रुग्णालयात गावात हा चारा आज रात्रीपर्यंत पोहोचेल याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची चारा मागणी असेल तोपर्यंत जनावराला चारा उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच उपरोक्त बाधित तालुक्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे नियमितपणे चारा उपलब्ध केला जाणार आहे. करमाळा तालुक्याला उपलब्ध करून देण्यात आलेला पाच टन चारा प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्यास रस्त्यांची अडचण आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे या भागात रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत, पाण्याचा विसर्ग कमी झाला की चारा तात्काळ बाधित गावापर्यंत पोहोचवला जाणार आहे.
      जिल्ह्याला मुरघास चारा उपलब्ध करून घेण्यात कोणतीही अडचण नाहीत्यामुळे यापुढे ही जिल्ह्यातील जनावरांना जेवढा चारा आवश्यक असेल तेवढा उपलब्ध करण्याचे नियोजन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केलेले आहे. इतर पूरग्रस्त जिल्ह्यात आणखी चारा वितरण सुरू झालेले नाहीपरंतु आपल्या जिल्ह्यात हे सर्वप्रथम चारा वितरण सुरू झालेले आहे.
    जिल्ह्यात आलेला सर्व चारा प्रत्येक बाधित तालुका व गावापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांचे महत्त्वपूर्ण भूमिका असून त्यांची जबाबदारी ते अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडत आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments