Hot Posts

6/recent/ticker-posts

अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत

  अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत




अक्कलकोट : (कटूसत्य वृत्त):- 
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात शनिवार रोजी सायंकाळी ७ वा. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे  क्रियाशील सदस्य अरविंद शिंदे सर यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली.*
यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते अरविंद शिंदे सर यांचा सत्कार करण्यात आला. 
गेल्या चार दिवसापासून श्रींचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे. शमीवृक्षाखाली गेल्या ३२ वर्षापूर्वी श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर व सभामंडप बांधण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थांच्या पावन भूमीवर श्री शमीविघ्नेश गणेश असल्याने त्याचे स्थान व महात्म्य अलौकिक आहे.

या प्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, मुख्य पालखी संयोजक संतोष भोसले, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, मुख्य सुरक्षा रक्षक महादेव अनगले, अनिल गवळी, ज्ञानेश्वर भोसले, अॅड.फहीम पीरझादे, आप्पा हंचाटे, सौरभ मोरे, वैभव मोरे, रोहन शिर्के,  अतिष पवार, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, राजू पवार,  प्रसाद हुल्ले, बाळासाहेब घाडगे, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, तानाजी पाटील, अनिल बिराजदार, रमेश हेगडे, बसवराज क्यार, बाबुशा महिंद्रकर, शिवाजी उपरे,  महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, समर्थ चव्हाण, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी, शिवाजी काळे, श्रीकांत स्वामी, धानय्या हिरेमठ, विलास रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

*चौकट :*
*रविवार दि.३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वा. सुरेश चिल्लावार, पोलिस निरीक्षक, दक्षिण पोलिस ठाणे, अक्कलकोट यांच्या हस्ते श्रींची पूजा आयोजित करण्यात आली आहे.*
Reactions

Post a Comment

0 Comments