Hot Posts

6/recent/ticker-posts

महावीर बँकेला 4.63 कोटींचा नफा - चेअरमन दीपक मुनोत

 महावीर बँकेला 4.63 कोटींचा नफा - चेअरमन दीपक मुनोत




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सर्वसाधारण सभेत  बँकेच्या तीन वस्तू स्वमालकीच्या असून मुख्य शाखा करिता कार्पोरेट ऑफिस उभारण्याची सूचना सभासदाकडून करण्यात आली.
सोलापूर येथील बँकिंग क्षेत्रात अल्पवधीतच नावाजलेल्या महावीर सहकारी बँकेचा वार्षिक सर्वसाधारण सभा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होऊन बँकेला 4.63 कोटीचा निव्वळ नफा झाल्याचे चेअरमन दीपक मुनोत यांनी सांगितले.

बँकेच्या स्वमालकीच्या तीन इमारती असून बँकेचे मुख्य इमारत मुख्य शाखा कार्पोरेट लोक असलेल्या इमारतीत स्थानापन्न व्हावे असे सूचना काही सभासदांनी अग्रेसिव्ह पणे मांडलेले त्या चेअरमन यांनी पूर्ण दात देऊन लवकरच आपण कॉर्पोरेट लुक असलेले ऑफिस उभारू असा शब्द दिला.

सभासदांना यंदाच्या वर्षी 10% लाभांश देण्याकरिता मान्यता देण्यात आली. बँकेने 2012 स*** सुरू केलेल्या 38 कोटी ठेवीवरून आज अखेर 520 कोटींचा ठेवींचा पल्ला पार केलेला आहे बँकेचे एकूण जवळपास एक हजार कोटी असा व्यवसाय पूर्ण झालेला आहे त्यामुळे सभासदांनी अभिनंदनचा ठराव मांडला.

महावीर बँकेची ही 28 वे वार्षिक सर्वसाधारण सभा गुजराती भवन येथे संपन्न झाली विद्यमान चेअरमन या वार्षिक सभेचे अध्यक्ष पद भूषविला त्यांच्यासोबत गुरुजी श्री आचार्य नारायण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित सदस्य सुशील कुमार सोनीग्रा राहुल कोरुलकर ज्ञानेश्वर माकल जयंत होले पाटील संतोष भंडारी व अध्यक्ष इंधर्मल जैन यांचा सत्कार करण्यात आला तसेच सामाजिक क्रीडा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले कीर्तन होरा आदित्य गिरम मोक्षा वेद श्रीधर नादरगी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

बँकेचे सर्व संचालक या सर्व साधारण साबेस उपस्थित होते सभा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले. सभासदांनी ठेवीदारांनी कर्जदारांनी बँकेवर मोठा विश्वास दाखवला याही पुढे आपल्या विश्वासाला सार्थ राहून बँकेचा व्यवसाय असेच पुढे नेऊ असा वचन बँकेचे चेअरमन दीपक मुनोत यांनी दिला.
Reactions

Post a Comment

0 Comments