Hot Posts

6/recent/ticker-posts

अक्कलकोट नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

 अक्कलकोट नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

अक्कलकोट नगर : (कटूसत्य वृत्त):- परिषदेच्या २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भौगोलिक सीमांसह प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून याविषयी ३१ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
२०११ च्या लोकसंख्येच्या आधारे प्रभाग रचना करण्यात आली असून नगर परिषद क्षेत्रामधून २५ सदस्यांना निवडून द्यावयाचे आहे. शहरातील ४० हजार १०३ लोकसंख्येपैकी अनुसूचित जातीचे ५ हजार ३०५ तर अनुसूचित जमातीची ७६९ लोकसंख्या असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली. नगर परिषदेत दोन सदस्य असणाऱ्या ११ प्रभागांची रचना करण्यात आली असून प्रभाग रचना करताना ३ हजार २०८ लोकसंख्या अनुसरून प्रारूप प्रभाग रचना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 
२०१६ मध्ये झालेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणात
बदल झाला असून यामुळे विद्यमान नगरसेवक व नगरपरिषद निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या मंडळींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यावेळी सदस्य संख्या २३ होती आणि ११ प्रभाग होते. यावेळी १२ प्रभाग आहेत त्यात दोन सदस्यीय ११ तर तीन सदस्यीय एक असे २५ सदस्य यावेळी राहणार आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत याविषयी आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर अंतिम निर्णय घेऊन प्रभाग रचना व त्यावरील आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments