उद्योग व व्यापार विभागाला नवी दिशा देऊ
उद्योग व व्यापारी विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे; उद्योग व व्यापार विभागाची बैठक
पंढरपूर :(कटूसत्य वृत्त):- उद्योजकांच्या स्वप्नांना आकार देण्याचा आणि व्यापारीवर्गाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्याचा प्रमुख या नात्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने व्यापाऱ्यांशी व उद्योजकांशी थेट संवाद साधून लवकरच पुढील बैठकीचे आयोजन करू. आपल्या नेतृत्वात उद्योग व व्यापार विभागाला नवी दिशा व नवे बळ देऊ, अशी ठाम ग्वाही उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उद्योग व व्यापार विभागाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व पक्षाचे युवा नेते, फ्रंटल सेल प्रमुख आ. रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस भवनात पार पडली. यावेळी फाटे बोलत होते. या बैठकीत आ. रोहित पवार यांनी
केवळ विभागाचा आढावा घेत प्रत्येक पदाधिकाऱ्याला बोलण्याची संधी दिली. त्यांच्या भागातील व्यापारी व उद्योग समस्या मनापासून ऐकून घेतल्या. प्रत्येक व्यापाऱ्यांच्या मनातील वेदना समजून घेऊन त्यांना न्याय मिळवून देणे, हीच खरी आपली जबाबदारी असल्याचे सांगत सर्वांना काम करण्याची नवी ऊर्जा दिली. लहान उद्योजकांपासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांचे प्रश्न सोडवण्याचा संकल्प यावेळी आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. तसेच व्यापाऱ्यांच्या हक्कासाठी व समस्यांच्या निवारणासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची हमी दिली. या बैठकीत प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, पक्षाचे महाराष्ट्र
प्रदेश प्रवक्ते रविकांत वर्पे, उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव, विभागा राज्य कार्यकारिणी,
पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष उपस्थित होते. आभार प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय काळे यांनी मानले.
0 Comments