सहकार महर्षि साखर कारखान्यामध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 18, 2025

सहकार महर्षि साखर कारखान्यामध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 सहकार महर्षि साखर कारखान्यामध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


अकलूज (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये १५ ऑगस्ट २०२५ रोजीचे आपले देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम कारखान्याच्या संचालिका  स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते सकाळी ठिक ८.०० वाजता संपन्न झाला. कार्यक्रमामध्ये कारखान्याचे संचालक, खातेप्रमुख व कामगार यांनी राष्ट्रध्वजास सलामी देऊन राष्ट्रगीत व ध्वजगीताचे गायन केले.

त्यानंतर कारखाना मुख्य कार्यालयासमोरील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांचे पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करण्यात आहे.

सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख तसेच संचालक विराज निंबाळकर, जयदिप एकतपुरे, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक रामचंद्रराव सावंत-पाटील, कार्यलक्षी संचालक - रणजित रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, दत्तात्रय चव्हाण तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले व खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages