पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते विविध विभागांच्या सन्मानपत्र व पुरस्कारांचे वितरण
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- भारतीय स्वातंत्र्य दिना निमित मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी ठीक नऊ वाजून पाच मिनिटांनी करण्यात आले.
यावेळी शासनाच्या विविध विभागाचे पुरस्कार वितरण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
*पोलिस अधिकारी कर्मचारी यांना त्यांचे क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेबाबत पारितोषिक देऊन गौरविण्यात आले*-
पोलीस दलामध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपती पदक मिळाल्याबाबत सहायक पोलीस आयुक्त राजन माने, भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासन यांच्याकडून विशेष सेवा पदक मंजूर करण्यात आल्याबद्दल पोलीस उपअधिक्षक ग्रामीण संकेत देवळेकर, भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासन यांच्याकडून शौर्यपदक मंजूर करण्यात आल्याबद्दल माढा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक माढा नेताजी बंडगर, नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये नेमणूकीस असताना नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकादेशीर कारवायांना परिणामकारक रित्या आळा घालून कर्तव्य बजावून विहित केलेल्या कालावधीत पूर्ण केल्याबद्दल पोलीस आयुक्त सोलापूर शहर कार्यालयाचे यंत्र संचालक (सफौ) संतोष देशपांडे, भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासन यांच्याकडून विशेष सेवा पदक मंजूर करण्यात आल्याबद्दल सोलापूर ग्रामीणचे बिनतारी संदेश विभागाचे पोलीस हवालदार औदुंबर टरले यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
*मा.मुख्यमंत्री महोदयांचे महत्वकांक्षी कार्यक्रम 100 दिवसांची कार्यालयानी सुधारणा विशेष मोहिम पुणे विभागातून निवडण्यात आलेली उत्कृष्ट कार्यालये*–
उपविभागीय अधिकारी कार्यालय माळशिरस, श्रीमती विजया पांगारकर, उपविभागीय कार्यालयात तृतीय क्रमांक, तालुका वैद्यकीय अधिकारी माढा डॉक्टर अविनाश खांडेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी गटात प्रथम क्रमांक, तालुका वैद्यकीय अधिकारी माळशिरस डॉ. प्रियंका शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी गटात द्वितीय क्रमांक, तालुका कृषी अधिकारी करमाळा देवराज चव्हाण तालुका कृषी अधिकारी गटात द्वितीय क्रमांक, वनपरिक्षेत्र अधिकारी सोलापूर रोहितकुमार गांगर्डे वनपरिक्षेत्र अधिकारी गटात तृतीय क्रमांक, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना वैराग श्रीमती रेश्मा पठाण प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना गटात तृतीय क्रमांक, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) सोलापूर शहर पश्चिम दिपक ढेपे बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) गटात तृतीय क्रमांक, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) सोलापूर शहर पुर्व विजय खोमणे बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) गटात द्वितीय क्रमांक, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त तालुका लघु पशु सर्व चिकीत्सालय पंढरपूर तानाजी खांडेकर सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त लघु पशु सर्व विकीत्सालय गटात द्वितीय क्रमांक, उप अभियंता जलसंपदा उजनी कालवा उपविभाग क्र.16 सोलापूर बाळासाहेब जाधव उप अभियंता जलसंपदा गटात प्रथम क्रमांक, उपविभागीय जलसंधारण अधिकारी मोडनिंब देवेंद्र कदम उपविभागीय उलसंधारण अधिकारी गटात द्वितीय क्रमांक, सहा निबंधक (सहकारी संस्था) उत्तर सोलापूर दत्तात्रय भवर सहा. निबंधक (सहकारी संस्था) गटात तृतीय क्रमांक, उपकोषागार अधिकारी पंढरपूर विठ्ठल पाटील उपकोषागार अधिकारी गटात द्वितीय क्रमांक, तालुका क्रिडा अधिकारी अक्कलकोट नदीम शेख तालुका क्रिडा अधिकारी गटात तृतीय क्रमांक, उपजिल्हा रुग्णालय अकलुज डॉ. एम.एन. गुडे उपजिल्हा/ग्रामीण रुग्णालय गटात प्रथम क्रमांक, उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर डॉ.महेश सुडके उपजिल्हा / ग्रामीण रुग्णालय गटात द्वितीय क्रमांक, उपजिल्हा रुग्णालय बार्शी डॉ.एस.ए.बोपलकर उपजिल्हा /ग्रामीण रुग्णालय गटात तृतीय क्रमांक, गट शिक्षण अधिकारी अक्कलकोट प्रशांत अरबळी गट शिक्षण अधिकारी गटात तृतीय क्रमांक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोलापूर, सुनिल हुसे जिल्हा ग्रंथालय अधिकारी गटात.
*अवयवदान कार्यक्रमातील अवयव दात्या व्यक्तीचे नाव व सन्मानपत्र प्राप्त व्यक्तींची नावे - अवयव दाता ओंकार महिंद्रकर सन्मानपत्र प्राप्त व्यक्ती अशोक रघुनाथ महिंद्रकर, अवयवदाता कृष्णहरी बोम्मा सन्मानपत्र प्राप्त व्यक्ती गुरूम सत्यनारायण, अवयव दाता सपना निलेश चक्रे सन्मानपत्र प्राप्त व्यक्ती निलेश चक्रे.
*सर्वोत्कृष्ट अशा स्वयंसेविका पुरस्कार- जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, सोलापूर श्रीमती सुमिता राजगुरू आरोग्य विभागांतर्गत गाव पातळीवर आरोग्य सेवा लाभार्थीला देण्यामध्ये उल्लेखनीय काम केले. सर्वोत्कृष्ट आशा गट प्रवर्तक पुरस्कार जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, सोलापूर श्रीमती ज्योती चंद्रकांत विडेकर आरोग्य विभागांतर्गत गाव पातळीवर आरोग्य सेवा लाभार्थीला देण्यात उल्लेखनीय काम केले.
*विभागस्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा प्राविण्य मिळालेल्या खेळाडुचा सत्कार जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सोलापूर सेंट जोसेफ हायस्कूल सोलापूर चि.राजवर्धन जाधव विभागीय शालेय क्रिडा स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुले वयोगटातील मिडले रिले 4 बाय 100 (जलतरण सांघिक खेळ) मध्ये तृतीय क्रमांक मिळाले, सेंट जोसेफ हायसकुल सोलापूर हर्षदा जाधव विभागीय शालेय क्रिडा स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुली वयोगटातील मिडले रिले 4 बाय100 (जलतरण सांघिक खेळ) मध्ये तृतीय क्रमांक मिळाले.
*राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव-* शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद सोलापूर आदर्श पब्लिक स्कूल अकोलगांव ता.कुर्डूवाडी कुमारी काव्या निलेश देशमुख पुर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी मध्ये ग्रामीण भागातून 95.97% घेवून राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद सोलापूर, सुयश विद्यालय, बार्शी साक्षी दिनेश हाके पुर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी मध्ये शहरी भागातून 95.33% घेऊन राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले.
* सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून श्रीमती विमल शंकर साबळे यांना बागायत शेतजमीन वाटप करण्यात आली.
* जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथील श्रीमती सुरेखा कोळी यांना पुणे महसूल विभाग स्तरावर उत्कृष्ट महसूल सहाय्यक म्हणून गौरविण्यात आले. याप्रकारे या प्रकारे स्वातंत्र्य दिनाच्या शुभप्रसंगी विविध विभागातील मान्यवर अधिकारी कर्मचारी तसेच विद्यार्थी यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, राज्य राखीव दलाच्या समादेशक डॉ.दिपाली काळे, केगाव पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजयकुमार चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
*************
0 Comments