सीईओ जंगम शिक्षणाधिकाऱ्यांवर चिडून सभागृह सोडले
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या विशेष शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेदरम्यान प्राथमिक शिक्षण विभागाचा ढिसाळ आणि संत कारभार पाहून वैतागलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या कारभारावर चिडत “काय फालतूपणा लावलाय” असे म्हणून थेट त्यांनी सभागृह सोडले.
सोलापूर जिल्हा परिषदेमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात सोलापूर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या सुमारे शंभरहून अधिक विशेष शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू होती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम प्राथमिक शिक्षणाधिकारी आदर्श महानगरपालिकेचे प्रशासनाधिकारी विठ्ठल ढेपे उपशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधीक्षक यांच्यासह समायोजनाला आलेले शिक्षकांची उपस्थिती होती.
सुमारे 100 कंत्राटी विशेष शिक्षकांना कायम सेवेत करण्यात आले यावेळी या प्रक्रिया दरम्यान सभागृहामध्ये प्राथमिक शिक्षण विभागाचा अत्यंत ढिसाळ कारभार सुरू होता, कोणाच्या कुणाकडे लक्ष नव्हते, हे पाहून सीईओ जंगम बरेच वैतागल्याचे दिसून आले.
त्यातच शिक्षणाधिकाऱ्यांना कुणाचे तरी फोन येत होते, कर्मचाऱ्यांनी या समायोजनाचे नियोजन व्यवस्थित केल्याचे पाहायला मिळाले नाही. बराच वेळ ताटकळत बसलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी थेट प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना काय फालतूपणा लावलाय सर्व व्यवस्थित झाल्यावर बोलवा असे म्हणून तावातावाने सभागृह सोडले. यावरून प्राथमिक शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभाराचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
0 Comments