बार्शीची नांदेडमधील पूरग्रस्तांसाठी सरशी, पीडित कुटूंबियांना मदत
बार्शी (कटूसत्य वृत्त):- नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील रावणगाव (भा) येथील गावास पुराचा जबरदस्त फटका बसला. या गावातील 271 नागरिकांना गावातून सुमारे तीन किलोमीटर पाण्यातून रेस्क्यू करण्यात आले पूरग्रस्त नागरिकांना तात्पुरते निवारा शेड उभारून ठेवण्यात आले आहे. या कॅम्पमधील कुंटबियाना बार्शी तहसीलदार एफ.आर.शेख,व रेडक्रॉस सेक्रेटरी अजित कुंकूलोळ व संचालक मंडळाने मदत करण्याचे ठरविले.
तहसीलदार एफ आर.शेख यांच्यासह रेडक्रॉस सदस्य पञकार संतोष सुर्यवंशी, प्रशांत बुडूख,उमेश देशमाने व राहूल कुंभार यांनी गावातील पूरग्रस्त पीडित कुटुंबीयांना बार्शी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने संसार उपयोगी साहित्य किचन सेट, चटई, बेडशीट, साडी, जर्किन, बादली, रस्सी, हॅन्ड वॉश, मेणबत्ती पाकीटे व गोडे तेल पाकीट वाटप कॅम्पमध्ये जाऊन केले.
बार्शी तिथं सरशी हे आपण अनेकदा पाहिलं आहे, बार्शीमध्ये तो सेवाभाव आणि मदतीचा हात देण्याची वृत्ती अंगीकृत आहे. त्याच सेवा भावानेतून बार्शीतील इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्यावतीने पूरग्रस्त पीडितांना मदतीचा हात देण्यात आला.
0 Comments