आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 30, 2025

आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाई

 आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाई



ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन नको : पोलीस आयुक्त

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-  आवाजाची मर्यादा पाळून मिरवणुका काढायला कोणाचाही विरोध नाही, पण आवाजाची पातळी ओलांडल्यास यापुढे पोलिसांकडून ध्वनिप्रदूषण कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून संबंधित मंडळांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.

डीजेमुक्त सोलापूर कृती समिती, सजग सोलापूरकर, शहरातील ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स, शालेय विद्याथ्र्यांसह विविध सामाजिक संघटना डीजेच्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. मध्यवर्ती

गणेशोत्सव मंडळांनीही त्यासाठी सकारात्मकता दर्शविली आहे. तर दुसरीकडे मंडप डेकोरेशन, साऊंड सिस्टिम व्यावसायिकांनी डीजेवाल्यांच्या भूमिकेला विरोध केला आहे. तसेच पोलीस आयुक्त हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने डीजेवाले नरमले आहेत. गणेशोत्सवाची प्रतिष्ठापना कमी आवाजात व शांततेत झाली, आता विसर्जन मिरवणुकीत ९५ टक्के मंडळांनी पारंपरिक वाद्य वाजवणार असल्याचे सांगितले. त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुका देखील डीजेमुक्त निघतील, असा विश्वास पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी व्यक्त केला आहे.

वर्षभरातील सर्वच जयंती आणि इतर उत्सवांमध्ये ध्वनिप्रदूषण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला

आहे. सर्वांसाठी समान निर्णय असणार आहे. मागच्या वर्षी 'श्री'च्या सांगता मिरवणुकीत १९२

मंडळांनी सहभाग नोंदवला होता. यावर्षी जवळपास २०० मंडळे सहभागी होण्याची शक्यता आहे. तरीही आवाजाची मर्यादा ही कमी होईल, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले. डीजेमुक्त सोलापूर व्हावे

अशी सर्वांचीच मागणी असून त्या अनुषंगाने मध्यवर्ती मंडळे, डीजे व्यावसायिकांची देखील पोलिसांनी बैठक घेतली. त्यांनीही सकारात्मकता दर्शविली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोलापूर शहरात डीजेच्या कर्णकर्कश आवाज ऐकू आला नाही. त्याबद्दल अनेकांनी फोन करून समाधान व्यक्त केले. आवाजाची मर्यादा पाळून मिरवणुका काढायला कोणाचाही विरोध नाही, पण आवाजाची पातळी ओलांडल्यास यापुढे पोलीस ध्वनिप्रदूषण कायदा व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्दे शानुसार संबंधित मंडळांवर कडक कारवाई करतील, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. या पत्रकार परिषदेसाठी पोलीस उपायुक्त विजय कबाडे, डॉ. अश्विनी पाटील, हसन गौहर हे उपस्थित होते.

चौकट  

स्पीकर, डेकोरेशनवर बंधने नाहीत

गणेशोत्सवाच्या मंडपात स्पीकरवर गाणे वाजवायची नाहीत,

डेकोरेशन सुरू ठेवायचे नाही असा गैरसमज पसरवला जात

आहे, अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नका. शेवटच्या

तीन दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत साऊंड सिस्टिम आणि लाईट

डेकोरेशन सुरूच असणार आहे. परंतु आवाजाची मर्यादा ही

ओलांडू नये. आवाजाचा कोणाला त्रास झाला तर त्यांनी ११२

वर किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, अशा मंडळांवर कडक

कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त एम. राज कुमार

यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages