भारतीय स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादीच्या वतीने उत्साहात साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, सर्वस्वाचा त्याग केलेल्या, देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्यवीरांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्य म्हणजे केवळ इतिहासाची आठवण नाही, तर भविष्यासाठीची बांधिलकी आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, लोकशाही आणि सामाजिक सौहार्द जपणं ही आज प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. चला आपण सर्वांनी एकत्र येऊ आणि कष्ट, प्रामाणिकपणा व राष्ट्रनिष्ठेच्या बळावर भारताला जगातील सर्वात सामर्थ्यशाली, प्रगत आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्याचा निर्धार या स्वातंत्र्यदिनी करूया असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केले.
प्रथम वंदेमातरम गीत गाण्यात आले नंतर ध्वजारोहण करून राष्ट्रध्वज फडकवून सलामी देण्यात आली ध्वजगीत गाऊन संविधान वाचन करण्यात आले त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या ध्वजारोहणचे संचलन आणि आयोजन राष्ट्रवादी सेवादलचे शहर अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी अतिशय उत्कृष्ट केले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार
कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान जेष्ठ नेते चंद्रकांत दायमा
अल्पसंख्याक आयोग सदस्य वसीम बुऱ्हाण माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे जेष्ठ नेते हेमंत चौधरी राष्ट्रीय सचिव फारुक मटके जेष्ठ मारूतीराव जाधव महिला अध्यक्ष संगीता जोगधनकर जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले युवती अध्यक्ष किरण माशाळकर सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का युवक प्रदेश सरचिटणीस महेश कुलकर्णी
युवक संघटक दत्तात्रय बडगंची अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख सांस्कृतिक व नाट्य विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे VJNT सेल विभाग अध्यक्ष रुपेश भोसले ओबीसी सेल कार्याध्यक्ष आयुब शेख वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष अमोल कोटीवाले कार्याध्यक्ष मनोज शेरला शहर उपाध्यक्ष शकील शेख शहर सचिव दत्तात्रय बनसोडे शहर सचिव मैनुद्दीन इनामदार शहर सचिव मौलाली शेख वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकरअल्पसंख्याक विभाग जनरल सेक्रेटरी मोईज मुल्ला अल्पसंख्याक विभाग मध्य विधानसभा अध्यक्ष नय्युम सालार अल्पसंख्याक विभाग दक्षिण विधानसभा अध्यक्ष अशपाक कुरेशी दिव्यांग सेल विभाग अध्यक्ष एम एम इटकळे शहर उत्तर संघटक प्रकाश झाडबुके श्यामराव गांगर्डे सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे सोशल मीडिया विभाग कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे सोशल मिडीया पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बाबू पटेल यशराज डोळसे अजिक्य उप्पीन निशांत तारानाईक महिला आघाडी पदाधिकारी उमादेवी झाडबुके मशाक मुल्ला शंकर पुजारी निलेश जाधव सुरेश जाधव महिला आघाडी पदाधिकारी चैताली क्षीरसागर यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments