Hot Posts

6/recent/ticker-posts

हेरिटेज मनिधारी सोसायटीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 हेरिटेज मनिधारी सोसायटीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील हेरिटेज मनिधारी एम्पायर सोसायटीत भारतीय स्वातंत्र्याचा ७९वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका शिक्षण मंडळाचे सेवानिवृत्त कार्यालय अधीक्षक काशिनाथ बिराजदार व सामाजिक कार्यकर्ते संजय जोगीपेठकर यांच्या हस्ते भारतमातेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.त्यावेळी भारतमाता की जय, वंदेमातरमचा जयघोष करण्यात आला. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सतिश नोमुल मावळते अध्यक्ष गजाननराव होनराव यांच्या हस्ते नॅपकिन बुके देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.याप्रसंगी माजी अध्यक्ष सुरेश येळमेली,सचिन पतंगे,शंकर गाडी व पोलिस अधिकारी समाने,जना स्मॉल फायनान्स बँकेचे मॅनेंजर संतोष स्वामी व कर्मचारी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक,महिला भगिनी व लहान मुले उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ वडतिले यांनी केले.याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी सोमनाथ करके यांचे भाषण झाले. बिराजदार व जोगीपेठकर यांनी आपल्या भाषणात सोसायटीच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.

Reactions

Post a Comment

0 Comments