जय जिजाऊ च्या जय घोषात महिलांनी फोडली दहीहंडी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संभाजी ब्रिगेड च्या वतीने जुळे सोलापूर भागातील वैष्णवी प्रांगण येथे गोकुळाष्टमी निमित्ताने महिला दहीहंडी चे आयोजन करण्यात आले होते या महिला दहीहंडी मध्ये भर पावसात सुद्धा महिला व तरुणींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जय जिजाऊ च्या जयघोषत दहीहंडी फोडण्यात आली.
या दहीहंडी मध्ये विविध कर्तबगार महिलांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या महिलांना समाजाच्या विकासाच्या प्रवाहात समान संधी आणि अधिकार मिळवून देण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांनाही पुरुषांच्या बरोबरीने सण उत्सवामध्ये सहभाग घेता यावा या उद्देशाने संभाजी ब्रिगेड च्या वतीने जुळे सोलापूर भागात महिला दहीहंडीचे आयोजन करण्यात येते यंदा हे दहावे वर्ष असून यावर्षीची तीन थरांची दहीहंडी आसावरी कविटकर या गोविंदाने फोडली तिला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम कार्याध्यक्ष अरविंद शेळके यांनी आयोजन केले होते.
या कार्यक्रमास सोशल मीडिया रिल स्टार व नाट्य कलावंत पद्मावती शेखर रिल स्टार प्रीती वरडे संभाजी ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्ष मीनल दास जिल्हा उपाध्यक्ष मनीषा कोळी जिल्हा कार्याध्यक्ष माधुरी चव्हाण संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास शिवज्ञा ढोल ताशा पथकाने पारंपारिक वाद्याने रंगत आणली अनेक महिला तरुणींनी विविध गाण्यावर नृत्य करून आनंद लुटला
यावेळी युवराज ताकमोगे रमेश चव्हाण ओंकार कदम मल्लू भंडारे गजानन शिंदे रमेश भंडारे मुस्तफा शेख पिंटू कोरे आदींसह जुळे सोलापुर परिसरातील बहुसंख्य महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

0 Comments