हुतात्मा स्मारकात स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- हुतात्मा स्मारक, हुतात्मा सार्वजनिक वाचनालय, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ, सोलापूर येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. रिटायर्ड सीआयएसएफ( एएसआय रँकचे) राठोड एम आर यांचे शुभहस्ते ध्वजावंदन करण्यात आले. हुतात्मा स्मारकात ध्वजावंदन करण्याचे भाग्य लाभल्याने मी स्वतःला भाग्यशाली समजतो असे मत त्यांनी मांडले वाचनालय लोकाभिमुख झाली पाहिजेत वाचनालयात असलेला पुस्तक रुपी खजिना सर्व वाचकांनी मनसोक्त उपभोगला पाहिजे असेही मत त्यांनी मांडले उपस्थित सर्व वाचकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात वाचनालयाचे कार्यवाह ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी स्मारकाच्या इतिहासाला उजळणी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल सौ.वृषाली हजारे यांनी केले तर आभार लिपिक सौ. सारिका माडेकर यांनी मानले. यावेळी सेवक गीतांजली गंभीरे, निखिल पवार, प्रज्वल पाटील, संचालक रामलिंग चव्हाण, धोंडीबा बंडगर, संचालिका सौ.सारिका मोरे, रोहित फुटाणे, इस्माईल शेख, प्रतीक नकाते, शंकर कस्तुरी, संजय पारसवार, आय.के. शेख ,अनिकेत सिंग, रोहित राम, रहिमान शेख, कृष्णा शेट्टी यांच्यासह बहुसंख्य वाचक उपस्थित होते.
0 Comments