79 वा स्वातंत्र्य दिन ज्ञानदीप वाचनालयात साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा स्वातंत्र्य दिन ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, सोलापूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. सेवानिवृत्त सीआयएसएफ मोतीराम राठोड यांचे शुभहस्ते ध्वजावंदन करण्यात आले. उपस्थित सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रकाश मोरे यांनी केले.आभार लिपिक सौ. सारिका मोरे यांनी मानले.यावेळी सचिन माने,अमोल मठपती, मच्छिंद्र पौळ,उद्धव सुपुते, प्रभाकर फुलमाळी, सिद्धराज पाटील, वीरेंद्र प्रसाद माडीकर,तेजुसिंग चव्हाण, लव्हराळे आर.जी.,विठ्ठल पोळ, सौ सारिका माडीकर,यांच्या सह वाचक उपस्थित होते.
0 Comments