Hot Posts

6/recent/ticker-posts

मेघश्री गुंड हिस विठ्ठलवाडी शाळेचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदान

 मेघश्री गुंड हिस विठ्ठलवाडी शाळेचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदान 



माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी नागनाथ गणपत कदम यांच्या स्मरणार्थ अर्थशास्त्राचे प्रसिद्ध लेखक प्रा.डॉ.संतोष कदम यांनी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता‌ व विविध कौशल्ये प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांस आणखी प्रेरणा,प्रोत्साहन व शाबासकीची थाप देण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आलेला आदर्श विद्यार्थी पुरस्कार यावर्षी मेघश्री राजेंद्रकुमार गुंड हीस शाळेचे मुख्याध्यापक भारत पाटेकर व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश डुचाळ यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम 500 रुपये,स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ असे आहे.

मेघश्री गुंड हिने इयत्ता पहिली ते सातवी इयत्तेपर्यंत शालेय व सहशालेय उपक्रमात नोंदविलेला सक्रीय सहभाग, प्रत्येक इयत्तेतील शैक्षणिक गुणवत्ता,क्रिडा स्पर्धा व बुद्धीबळ स्पर्धेतील उज्ज्वल यश,विविध शासकीय व खासगी स्पर्धा परीक्षेतील यश, सांस्कृतिक उपक्रमातील प्राविण्य,वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन,पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची निर्मिती,वक्तृत्व, निबंध,सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील तालुका व जिल्हा स्तरावरील यश,विज्ञान प्रदर्शनातील सहभाग,वर्गातील उपस्थिती व वर्तन,शालेय शिस्त,नियम, आज्ञाधारकता,प्रामाणिकपणा व इतर अटींचे केलेले तंतोतंत पालन या सर्व बाबींचे निरीक्षण व नोंदी ठेवून गठित पुरस्कार समितीने सर्वांनुमते ही निवड केली आहे.ती विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्रकुमार गुंड यांची कन्या आहे.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

यावेळी सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,सरपंच मोनिका खरात,ग्रामसेविका रेश्मा पाटील,मेघना गुंड,वर्षा शेंडगे,पुजा कोकाटे,सृष्टी शेंडगे, उपाध्यक्ष गोपीनाथ मस्के, शिवाजी शेगर,भारत कदम, ऐजिनाथ उबाळे,गोरखनाथ शेगर,सुप्रिया ताकभाते,संजय सोनवणे,धनाजी सस्ते,दिपक गव्हाणे,स्वाती काशीद,स्वाती सस्ते,अश्विनी जाधव,सोनाप्पा वाघमोडे,महेश नागटिळक यांच्यासह ग्रामस्थ पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments