रेशन कार्डावरील दोनपेक्षा जास्त, कमी-जास्त वयाच्या बहिणी ठरणार अपात्र
सोलापूर : (कटूसत्य वृत्त):- एकाच रेशन कार्डावर दोनपेक्षा अधिक असलेल्या महिला तसेच २१ पेक्षा कमी वय आणि ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या एक लाख चार हजार महिलांची अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी सुरू आहे. त्या महि ला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. राज्य शासनाकडून महिला व बालकल्याण विभागास एक लाख चार हजार महिलांच्या याद्या प्राप्त झाल्या आहेत. त्याची पडताळणी अंगणवाडी सेविकांकडून केले जात आहे. ही पडताळणी दहा दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर अपात्र लाडक्या बहिणींची माहिती समोर येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाने दिली आहे. जिल्ह्यात ८७ हजार लाडक्या बहिणी या एकाच घरातील असून, एकाच रेशनकार्डावर दोन पेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. तर १७ हजार लाडक्या बहिणी २१ वर्षांपेक्षा कमी वय तर ६५ पेक्षा अधिक वय असलेल्या आहेत. त्यामुळे त्याची खातरजमा करण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी सुरू आहे.
शासनाकडून आलेल्या यादीच्या आधारावर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची पडताळणी जिल्ह्यातील चार हजार अंगणवाडी सेविका करत आहेत. त्या पडताळणीमधून जी आकडेवारी समोर येईल, त्यानुसार शासनाकडून कारवाई करण्यात येईल. लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे अधिकार आमच्याकडे नाहीत. --प्रसाद मिरकले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी
• एकाच रेशन कार्डावर अनेक लाभार्थी - ८७ हजार
• २१ पेक्षा कमी वय, ६५ पेक्षा जास्त वय १७ हजार
• जिल्ह्यातून चार हजार सेविकांकडून पडताळणी
• एक लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता
• राज्य शासनाकडून महिला व बालकल्याण विभागास एक
लाख चार हजार महिलांच्या याद्या प्राप्त
0 Comments