Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर विकास आराखडा अभ्यास समिती तयार करा

 पंढरपूर विकास आराखडा अभ्यास समिती तयार करा


जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत कॉरिडॉर बाधित परिसरातील मठ, मंदिरांच्या विश्वस्तांची मागणी

पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-   शासन, वारकरी संप्रदाय व पंढरपूर नागरिक यांचा सर्वांच्या संमतीने विकास आराखडा तयार करण्यासाठी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी, पंढरपूर क्षिण नागरिक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांचा एक प्रतिनिधी अशी पंढरपूर विकास आराखडा अभ्यास समिती तयार करावी. या समितीच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर विकास आराखड्याच्या पुनःमांडणीचा प्रयत्न झाला तर सर्वांना समाधान होईल. पंढरपूर विकास करणे शक्य होईल. या समितीच्या द्वाराच या प्रश्नावर तोडगा निघू शकतो. यावर आपण सकारात्मक निर्णय घ्यावा, असे निवेदन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी व तीर्थक्षेत्र बचाव समितीच्यावतीने देण्यात आले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर येथे कॉरिडॉर संदर्भात बाधित परिसरातील मठ, मंदिरांच्या विश्वस्तांशी मंगळवार, १२ रोजी चर्चा केली. यावेळी बाधितांकडून पंढरपुर विकास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना बैठकीनंतर निवेदन देताना राणा महाराज वासकर, कबीर महाराज, निलेश

बडवे, गणेश लंके, दत्तात्रय कवठेकर, मदन महाराज हरिदास, गणेश बडवे महाराज, भागवत महाराज चवरे. आराखडा अभ्यास समिती तयार करावी. अशी मागणी करण्यात आली. वारकऱ्यांना सुखसुविधा देण्यासाठी राज्य शासनाने पंढरपूर येथे कॉरिडॉर (विकास आराखडा) प्रस्तावित केला आहे. वारकरी संप्रदायातील सर्वांनी मिळून एक चांगला भुवैकुंठ विकास आराखडा शासनास सादर केला होता, त्याचे काय झाले, याचे उत्तर शासनाकडून मिळाले नसल्याचे वारकरी प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी

यांना बैठकीत सांगितले.

यावेळी राणा महाराज वासकर, कबीर महाराज, निलेश बडवे, गणेश लंके, दत्तात्रय कवठेकर, मदन

महाराज हरिदास, गणेश बडवे महाराज, भागवत महाराज चवरे, सुधीर रानडे, कौस्तुभ गुंडेवार, महेश महाराज देहूकर आदी उपस्थित होते.


प्रस्तावीत विकास आराखड्यात अनेक त्रुटी

प्रस्तावीत पंढरपूर विकास आराखड्यात अनेक त्रुटी असून, सदरचा प्रस्ताव वारकरी संप्रदायातील

मान्यवरांनी केलेल्या सुचना डावलून केला जात आहे. तसेच वारकऱ्यांचे प्रश्न वेगळे आणि उत्तरे वेगळी असा दिसून येत आहे. यामध्ये अनावश्यक भुसंपादन देखील दाखवण्यात आले असल्याने स्थानिकांकडून याला विरोध होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments