Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळच्या विकासासाठी तत्पर : आ. कल्याणशेट्टी

 मोहोळच्या विकासासाठी तत्पर : आ. कल्याणशेट्टी



सावळेश्वर येथे साडेपाच कोटींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन

पोखरापूर : (कटूसत्य वृत्त):-   मोहोळ तालुक्याच्या किंवा गावच्या राजकारणात मला काही रस नाही, मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. मोहोळच्या विकासासाठी मी तत्पर आहे, असे आश्वासन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सावळेश्वर येथे दिले.

मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे साडे पाच कोटींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी सावित्रीबाई फुले आणि लोकनेते बाबूराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी माजी आमदार राजन पाटील होते. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सज्जन पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सतीश काळे, रमेश माने, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, सभापती धनाजी गावडे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, सरपंच सखाराम साठे आदी उपस्थित होते. संतोष पवार म्हणाले, राजकारणामध्ये काम करत असताना माजी आमदार पाटील यांनी आमची ताकद

तुमच्याच मागे तालुक्याचा विकास होतो की नाही, या पेक्षा एखाद्याची कशी जिरवायची असेच राजकारण मोहोळ तालुक्यात सुरू झाले आहे. समीकरण काही बदलली तरी या तालुक्यात सहकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळी आमची ताकद तुमच्या मागे उभी करू, असे आश्वासन माजी आमदार राजन पाटील यांनी आ. सचिन कल्यानशेट्टी यांना दिले. अनेकांना मोठे केले. त्यांची माणसं पारख करण्याची कला शिकण्यासारखी आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments