सोलापूरात खंडपीठ होण्यासाठी मोठा लढा उभारणार
१५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री गोरे यांना निवेदन देणार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सोलापूर येथे स्थापन व्हावे,यासाठी शहरातील सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन शनिवारी मुंबई उच्च न्यायालय सोलापूर खंडपीठ कृती स्थापन केली. या कृती समितीतर्फे येत्या १५ ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सोलापुरात व्हावे या मागणीसाठी शनिवारी बैठक झाली.
१५ ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांना निवेदन देणार. सर्व लोकप्रतिनीधींना खंडपीठ व्हावे, यासाठी निवेदन देण्यात येणार आहे. खंडपीठासाठी भविष्यात मोठा लढा उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे सोलापूर येथे खंडपीठ स्थापन व्हावे,यासाठी वेक अप सोलापूर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहामध्ये शनिवारी सायंकाळी वकील मंडळी, वेक अप सोलापूर फाउंडेशन, सोलापूर विकास मंच,गिरिकर्णिका फाउंडेशन या संघटनांचे व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक झाली. यात कृती समिती गठित करण्यात आली. या बैठकीत कोल्हापूर येथे जे खंडपीठ स्थापन करण्यात आले, त्याला विरोध करण्यात आला. तसेच सोलापुरात खंडपीठ व्हावे यासाठी सोलापूर शेजारील धाराशिव, लातूर जिल्ह्याने खंडपीठासाठी पाठिंबा दिला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुका व शहर स्तरावरील सर्व वकिलांची एक बैठक मंगळवारी घेण्यात येणार आहे.यावेळी अॅड. खतीब वकील, वकील बारचे माजी अध्यक्ष अॅड. शिवशंकर घोडके, विकास मंचचे योगीन गुर्जर, अॅड.राजन दीक्षित, अॅड. केशव इंगळे,पत्रकार पांडुरंग सुरवसे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विजय जाधव, रूपेश इंगळे,आनंद पाटील, राजेश देशपांडे,आप्पा कन्नुरकर, गणेश शिलेदार हजर होते.
0 Comments