सदर प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ सुजीत मिश्रा यांच्या हस्ते १४ ऑगस्ट, रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात येणार आहे. यावेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक अंशूमाली कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार, भारतीय सैन्य दलातील अधिकारी आणि रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत. सदर प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ वाजे पर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार आहे. याप्रसंगी वीर माता, वीर पत्नी, निवृत्त माजी सैनिक यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
सदर प्रदर्शनामध्ये १८५७ ते १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना, ऐतिहासिक स्थळे, राष्ट्र ध्वजाचा इतिहास, सोलापुरातील चार हुतात्मे, सेल्फी बूथ, भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडी आणि घटनांचे दुर्मिळ छायाचित्रे व मजकूर सहित माहिती नागरिकांना बघता येणार आहे.
जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त नागरिक, इतिहास अभ्यासक, संशोधक, स्पर्धा परीक्षाचे विद्यार्थी व युवकानी छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजाकाकडून करण्यात आले आहे.
0 Comments